AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुक्र गोचर 2023: शुक्र तूळ राशीत करणार प्रवेश, या राशींवर होणार पैशाचा पाऊस

कुंडलीत शुक्र जर बलवान असेल तर त्या व्यक्तीला जीवनात सर्व प्रकारच्या सुख-सुविधा मिळतात. व्यक्तीची प्रगती होते. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्राला महत्त्वाचे स्थान आहे. शुक्र दर महिन्याला आपली राशी बदलतो. यामुळे सर्व राशींना त्यांच्या घराप्रमाणे लाभ मिळतात. जाणून घ्या आता शुक्र गोचरमुळे कोणत्या राशींना होणार फायदा.

शुक्र गोचर 2023: शुक्र तूळ राशीत करणार प्रवेश, या राशींवर होणार पैशाचा पाऊस
sukhra gochar
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 28, 2023 | 5:58 PM
Share

Shukra Gochar 2023 : नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शुक्र ग्रह दुसऱ्यांदा भ्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला संपत्ती आणि कीर्तीचे कारण मानले जाते. अशा स्थितीत काही राशींना लव्ह लाईफमध्ये लाभ मिळेल तर काही राशींच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होईल. 30 नोव्हेंबर रोजी शुक्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र सकाळी 01:14 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा प्रभाव सकारात्मक आणि नकारात्मक अशा सर्व राशींवर दिसून येईल.

या राशींना प्रेम मिळेल

मेष आणि मिथुन राशीच्या लोकांना शुक्र गोचरमुळे त्यांच्या प्रेम जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. मेष राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून अपार प्रेम मिळेल, मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेमाचा प्रवेश होईल. जर तुम्ही खरे प्रेम शोधत असाल तर तुमचा शोध पूर्ण होणार आहे.

प्रगतीचे मार्ग खुले होणार

शुक्र गोचरमुळे कन्या राशीला विशेष लाभ होणार आहे. त्यांची प्रगती होणार आहे. आर्थिक फायदा देखील होताना दिसत आहे. जोडीदाराचं प्रेम आणि सहकार्य दोन्ही मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ चांगला असणार आहे.

मान-सन्मान वाढणार

तूळ राशीच्या लोकांचा मान वाढणार आहे. आरोग्याच्या बाबतीही त्यांना फायदा होऊ शकतो. संपत्तीतही वाढ होणार आहे. कला क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. मकर राशीच्या लोकांचीही प्रतिष्ठा वाढणार आहे.

शनिदेव हे सध्या कुंभ राशीत विराजमान आहेत. कुंभ राशीच्या लोकांसाठी साडे सतीचा पहिला चरण सुरू आहे. पण शुक्र गोचरमुळे कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे.

अस्वीकरण-”या लेखात दिलेली माहितीच्या विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषशास्त्र याच्यातून संकलित करून देण्यात आली आहे.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच