Weekly Horoscope 30 January – 05 February 2022 | कसा असेल येणारा आठवडा, कोणाला गोड बातमी मिळणार, जाणून घ्या मेष ते कन्या राशींचे राशीभविष्य

Weekly Horoscope 30 January – 05 February 2022 | कसा असेल येणारा आठवडा, कोणाला गोड बातमी मिळणार, जाणून घ्या मेष ते कन्या राशींचे राशीभविष्य
Zodiac-Signs-2

येणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा टाळू शकता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 24, 2022 | 11:09 AM

डॉ. अजय भाम्बी –
Weekly Horoscope 30 January – 05 February 2022 | येणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा टाळू शकता. यावेळी कोणत्या गोष्टींबद्दल आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. या आठवड्यात आपल्यासाठी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर शुभ आहे, हे देखील जाणून घेऊ. (Weekly Horoscope Of All Zodiac Signs Rashifal From 30 January – 05 February 2022)

मेष (Mesh Rashi)  मेष राशींच्या व्यक्तींसाठी 30 January – 05 February हा आठवडा नव्या उमंग आणि उत्साहाने भरलेला आसणार आहे. तुमची बऱ्याच काळापासून थांबलेली काम या काळात पुर्ण होणार होणार आहेत. या शिवाय या आठवड्यात तुम्ही तुमच्या परिवाला वेळ देऊ शकता. तुमच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचे आगमन होणार आहे. तरुण वर्ग मात्र करियला घेऊन थोडा चिंतेत असेल. या काळात वाद विवादांपासून लांबच राहा. कामाच्या ठिकाणी नविन जबाबदारी मिळेल. त्यामुळे कामात व्यस्त असाल.

💠 लव्ह फोकस – वैवाहिक संबंधांमध्ये गैरसमजांमुळे काही वाद उद्भवू शकतात. तुमच्या नात्याशी प्रामाणिक रहा. आयुष्यात प्रेमाचे अंकूर फुलणार

💠 खबरदारी – सर्दी सारख्या आजाराने त्रस्त आसाल केवळ जास्त ताण येण्याच्या कारणांपासून स्वतःचे रक्षण करा.

💠 लकी रंग – पिवळा

💠 शुभ अंक – 3

 

वृषभ (Vrushabh):वृषभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा खूप व्यस्त असेल. कोणत्याही कामांमध्ये घरातील व्यक्तींची साथ मिळेल. कोर्ट केस चालू असल्याल त्यात यश मिळण्याची शक्याता आहे. त्यामुळे या काळात तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या कामावर ठेवा. तरुणांना करियममध्ये शुभ वार्ता मिळतील. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

💠 लव्ह फोकस – आयुष्यात प्रेमाचे अंकूर फुलणार, विवाहाचे संयोग आहेत.

💠 खबरदारी – थकवा सर्दी सारख्या आजाराने त्रस्त आसाल. वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करा

💠 लकी रंग – लाल

💠 शुभ अंक – 9

 

मिथुन (Mithun Rashi) :  या आठवड्यात समाज उपयोगी कामे कराल. सकारत्मता राहील. त्यामुळेच समाजात प्रतिष्ठा वाढेल. या आठवड्यात वाद होऊ शकतात. पण त्यांपासून लांब राहणंच योग्य राहील. मुलांसंबंधी एखादे काम असेल तर ते या आठवड्यात नक्की होईल. या सप्ताहामध्ये कोणाला ही पैसे देताना 100 वेळा विचार करा. नोकरीमध्ये व्यवसायामध्ये टेन्शन राहील.

💠 लव्ह फोकस – पती पत्नीमध्ये वाद होण्याची शक्याता आहे. प्रेमसंबंधात कटूता येऊ शकते त्यामुळे ही गोष्ट होणार नाही याची काळजी घ्या.

💠 खबरदारी – खाण्या पिण्यांच्या सवयींकडे लक्ष द्या, या आठवड्यात वायु रोगासंबंधी समस्या उद्भवतील.

💠 लकी रंग – सफेद

💠 शुभ अंक – 6

 

कर्क (Karka Rashi) :  कर्क राशीसाठी हा आठवडा आनंदवर्ता घेऊन येणार आहे. मागील काही दिवसांपासून असलेली मळभ निघून जाणार आहे. जर तुम्ही नविन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर हा तुमच्यासाठी हा उत्तम काळ आहे. या काळात तुम्हीला ताणवमुक्त वाटू शकते. काही ठिकाणी समजूतीने कामं करा. नोकरीमध्ये जबाबदारी वाढू शकते.

💠 लव्ह फोकस – प्रेमसंबंध अजूनच घट्ट होऊ शकतात. हा काळ स्वर्गाहून सुंदर असेल.

💠 खबरदारी – तणावापासून लांब राहा. या काळात मेडिटेशन आणि ध्यान कारा.

💠 लकी रंग – हिरवा

💠 शुभ अंक – 5

 

सिंह (Sinha Rashi) | सिंह राशीसाठी हा आठवडा खूप उत्साह असणारा असेल. लहान मुलांच्या अनेक समस्या सोडवण्यात तुम्हाला यश मिळेल. पण खूप जवळच्या व्यक्तीमुळे नात्यांमध्ये कडवटपणा येऊ शकतो. या काळात प्रवासाचा योग आहे. व्यवसायाला घेऊन अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात.

💠 लव्ह फोकस – या काळात लग्न जुळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या काळात लग्नासाठी प्रयत्न करत असाल तर यश नक्की मिळेल.

💠 खबरदारी – सर्दी, तापासारखे आजार होऊ शकतात. इम्यून सिस्टम चांगली ठेवा.

💠 लकी रंग – बदामी

💠 शुभ अंक – 2

 

कन्या (kanya Rashi) : या काळात तुम्हाला समाजात प्रतिष्ठा मिळू शकते. अर्थिकगोष्टी संबंधी काही व्यवहार असल्यास ते या काळात होऊ शकतात. हा संपूर्ण आठवडा कामांमध्ये वस्त राहील. या काळात जास्त खर्च होऊ शकतो त्यामुळे त्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी चिडचिड होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये सहकर्मचाऱ्यांसोबत चागंले संबध ठेवा.

💠 लव्ह फोकस – पती पत्नींनी एकमेकांप्रती सन्मान ठेवावा. परिवारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जावू शकता

💠 खबरदारी – दिनचर्या नित्यानियमाची ठेवा, या काळात आरोग्याची काळजी घ्या.

💠 लकी रंग – ऑरेंज

💠 शुभ अंक – 1

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

Laxmi | पैशाच्या विवंचनेत आहेत ? मग देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय नक्की करा, जाणून घ्या रंजक गोष्टी

24 January 2022 Panchang | 24 जानेवारी 2022, सोमवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Kalashtami 2022 | कालाष्टमी म्हणजे काय ? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें