AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weekly Horoscope 30 January – 05 February 2022 | काय होणार येणाऱ्या आठवड्यात, जाणून घ्या 30 ते 05 फेब्रुवारीपर्यंत तुळ ते मीन राशींचे राशीभविष्य

येणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा टाळू शकता.

Weekly Horoscope 30 January – 05 February 2022 | काय होणार येणाऱ्या आठवड्यात, जाणून घ्या 30 ते 05 फेब्रुवारीपर्यंत तुळ ते मीन राशींचे राशीभविष्य
राशीफळ
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 11:17 AM
Share

डॉ. अजय भाम्बी – Weekly Horoscope 30 January – 05 February 2022 | येणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा टाळू शकता. यावेळी कोणत्या गोष्टींबद्दल आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. या आठवड्यात आपल्यासाठी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर शुभ आहे, हे देखील जाणून घेऊ. (Weekly Horoscope Of All Zodiac Signs Rashifal From 30 January – 05 February 2022)

तुळ ( Tula Rashi) – या आठवड्यात तुम्ही नविन गोष्टी कराल. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळणार आहे. तुमच्या घरातील वातावरण आनंदायी राहील. या आठवड्यात तुम्ही खूप वस्त राहाल. नकारात्मक विचारांना तुमच्या पासून लांबच ठेवा. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला बडती मिळण्याची शक्याता आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

? लव्ह फोकस – प्रेम संबंधांमध्ये दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करा. घरातील प्रत्येकाच्या मताचा सन्मान करा.

? खबरदारी – दिनचर्या नित्यानियमाची ठेवा, रोज योगा करा, त्याने तुमच्या शरिराला आराम मिळेल.

? लकी रंग – हिरवा

? शुभ अंक – 5

वृश्चिक ( Vrushik Rashi) : आठवड्याच्या सुरुवातीला काही अडचणी येतील. पण, तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने आणि दृढनिश्चयाने त्यांचे समाधानही सहज शोधू शकाल. धार्मिक कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळेल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी करेल. अनावश्यक खर्चाची परिस्थिती राहील. तुमचे बजेट नक्की लक्षात ठेवा.

? लव्ह फोकस – घरातील प्रश्नांवरुन जीवनसाथी सोबत कलह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या.

? खबरदारी – दिनचर्या नित्यानियमाची ठेवा, महिला वर्गानी त्यांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी.

? लकी रंग – गुलाबी

? शुभ अंक – 6

धनु ( Dhanu ) : आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि जीवनशैलीबद्दल अधिक जागरुक असणे हे आपल्यामधील आकर्षणाचे कारण बनेल. समाजात आपली प्रतिमा अधिक सुधारेल. जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवेल. यावेळी पैशांशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. फसवले जाऊ शकता आणि तुम्ही काही आर्थिक अडचणीतही अडकू शकता. जमीन खरेदी आणि विक्री करताना, कागदपत्रांची संपूर्ण तपासणी करा.

? लव्ह फोकस – आपल्या व्यस्त वेळातून कुटुंबासाठी थोडा वेळ काढल्याने परस्पर संबंध गोड होतील आणि कुटुंबात आनंदी वातावरण असेल.

? खबरदारी – आरोग्य चांगले राहील. कोणत्याही प्रकारची काळजी करु नका. पण, निष्काळजी असणे हे योग्य नाही.

? लकी रंग – लाल

? शुभ अंक – 9

मकर (Makar) : भावनांऐवजी युक्ती आणि विवेक वापरा. परिस्थिती तुमच्या बाजूने काम करेल. घरात लहान पाहुण्याचे आगमन झाल्याच्या शुभ माहितीमुळे घरात उत्सवाचे वातावरण असेल. तसेच, कोणतेही अडकलेले काम पूर्ण करण्यासाठी देखील योग्य वेळ आहे. यावेळी कोणतीही योजना बनवण्यापूर्वी त्याचा नीट विचार करा. तसेच घरातील सदस्यांचा सल्ला घेणे चांगले होईल. पैशांच्या बाबतीत, कोणावरही विश्वास ठेवू नका आणि सर्व कामे स्वतः हाताळा.

? लव्ह फोकस – आपल्या व्यस्त वेळातून कुटुंबासाठी थोडा वेळ काढल्याने परस्पर संबंध गोड होतील आणि कुटुंबात आनंदी वातावरण असेल.

? खबरदारी – आरोग्य चांगले राहील. कोणत्याही प्रकारची काळजी करु नका. पण, निष्काळजी असणे हे योग्य नाही.

? लकी रंग – लाल

? शुभ अंक – 9

कुंभः (Kumbha Rashi) – घराच्या नूतनीकरण किंवा देखभालीशी संबंधित योजनांवर चर्चा होईल. कोणत्याही सामाजिक कार्यात तुमच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे तुमचा सन्मान वाढेल. जर तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठीही वेळ अनुकूल आहे. परंतु कधीकधी नकारात्मक गोष्टी जसे की तुमच्या विचारांमध्ये अहंकार आणि संकुचितपणा कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ शकतो, तुमच्या वागण्यात आणि विचारांमध्ये बदल आणण्यासाठी काही आत्मचिंतन करा.

? लव्ह फोकस – आपल्या व्यस्त वेळातून कुटुंबासाठी थोडा वेळ काढल्याने परस्पर संबंध गोड होतील आणि कुटुंबात आनंदी वातावरण असेल.

? खबरदारी – आरोग्य चांगले राहील. कोणत्याही प्रकारची काळजी करु नका. पण, निष्काळजी असणे हे योग्य नाही.

? लकी रंग – आकाशी

? शुभ अंक – 8

मीन (Meen Rashi)

कुटुंबात कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल आणि मुलांच्या चांगल्या विचारांमुळे त्यांचे कौतुकही होईल. जर जमिनीशी संबंधित कामांमध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही योजना असेल तर ती त्वरित अंमलात आणा. परिस्थिती अनुकूल आहे. आपला स्वभाव आणि विचार सकारात्मक ठेवा. कधीकधी तुमचा संशयास्पद स्वभाव इतरांसाठी अडचणीचे कारण बनतो. निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया न घालवता तरुणांनी त्यांच्या करिअर योजनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

? लव्ह फोकस – व्यस्ततेमुळे पती-पत्नी दोघेही घरी वेळ देऊ शकणार नाहीत. पण घराचे वातावरण चांगले राहील, कशाचीही काळजी करु नका.

? खबरदारी – जास्त कामामुळे स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. ध्यान आणि योगा हा या समस्येवर योग्य उपाय आहे.

? लकी रंग – केशरी

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधीत बातम्या :

Laxmi | पैशाच्या विवंचनेत आहेत ? मग देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय नक्की करा, जाणून घ्या रंजक गोष्टी

24 January 2022 Panchang | 24 जानेवारी 2022, सोमवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Kalashtami 2022 | कालाष्टमी म्हणजे काय ? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.