Special Story | परंडा, नळदुर्ग किल्ले, तुळजा भवानीसारखं जागृत देवस्थान, उस्मानाबादच्या ‘या’ खास गोष्टी माहिती आहेत का ?

उसामानाबाद हा जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात स्थित आहे. या जिल्ह्यात बहुतांश भाग खडकाळ तर काही भाग सपाट आहे. हा जिल्हा बालाघाटच्या लहान पर्वताने व्यापालेला आहे. भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत स्थित आहेत. तर गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो.

Special Story | परंडा, नळदुर्ग किल्ले, तुळजा भवानीसारखं जागृत देवस्थान, उस्मानाबादच्या 'या' खास गोष्टी माहिती आहेत का ?
osmanabad district

मुंबई : मराठवाडा म्हटलं की अनेकांना वाटतं हा दुष्काळी प्रदेश आहे. या भागात काही विशेष नाही. मात्र, मराठवाडा हा महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग असून त्याचे राज्याच्या विकासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या भागात उद्योग, पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. येथील प्रत्येक जिल्ह्याचे आपापले वैशिष्य आहे. आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये आपण उस्मानाबाद जिल्ह्याविषयी जाणून घेऊया. (detail information of Osmanabad district in Marathi know about Naldurg fort Paranda fort Tuljabhavai temple)

उसामानाबाद हा जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात स्थित आहे. या जिल्ह्यात बहुतांश भाग खडकाळ तर काही भाग सपाट आहे. हा जिल्हा बालाघाटच्या लहान पर्वताने व्यापालेला आहे. भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत स्थित आहेत. तर गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिमेस सोलपूर जिल्हा आहे. तर उत्तर पश्चिमेस अहमदनर जिल्हा येतो. उत्तरेस बीड तर पूर्वेस लातूर जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या दक्षिणेस कर्नाटकची सीमा लागते. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7512.4 चौ.किमी आहे. यामध्ये शहरी भागाचे क्षेत्रफळ 241.4 चौ. किमी असून ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ 7271 चौ. किमी आहे. म्हणजेच या जिल्ह्यातील बहुतांश नागरिक हे ग्राणीण भागात राहतात.

♦  उस्मानाबाद जिल्हयात एकूण 8 तालुके आहेत.

♦ उस्मानाबाद

♦  तुळजापूर

♦  उमरगा

♦  लोहारा

♦  कळंब

♦ भूम

♦ परांडा

♦  वाशी

♦  पर्यटन आणि तिर्थस्थळं

या जिल्ह्यात अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. जिल्ह्यातील मंदिर, पठारं तसेच किल्ले एकदातरी भेट देऊन पाहावीत अशी आहेत. तुळजापूरची तुळजाभवानी, नळदुर्ग किल्ला, परंडा किल्ला, संत गोरोबा काका मंदिर, हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी यांचा दर्गा, माणकेश्वर मंदिर, शहादत्त आलमप्रभू समाधी स्थान, धाराशिव लेणी-उस्मानाबाद, डोमगावचा मठ, अचलबेट, देशमुखांची हावेली अशी अनेक ठिकाणं उस्मानाबादेत पाहण्यासारखी आहेत.

♦  किल्ले परंडा : हा अतिशय विशाल आणि भव्यदिव्य असा किल्ला आहे. जिल्हा मुख्यालयापासून हा किल्ला 67 किमी अंतरावर आहे. परंडा हा किल्ला बहामनींचा प्रसिद्ध वजीर महमूद गवा यांने बांधल्याचे इंम्पेरिअल गॅझेटिरमध्ये नमूद आहे. बहामनीनंतर या किल्ल्यावर निजामशाहीचे अधिपत्य झाले. सन 1600 मध्ये अहमदनगर म्हणजेच तत्कालीन निजामशाहीच्या राजधानीवर मुघलांचे वर्चस्व निर्माण झाले. त्यानंतर काही काळ मुर्तजा निजामशहा 2 ने परंडा येथून आपला राज्यकारभार हाकला.

♦  श्री. क्षेत्र तुळजापूर : हे राज्यातील एक जागृत देवस्थान असल्याची मान्यता आहे. येथे तुळजा भवानी मातेचे मंदीर आहे. हे ठिकाण बालाघाट डोंगराच्या पश्चिम कडावर आहे. तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातून भाविक येत असतात. येथील देवीचे मंदिर हे पूर्वाभीमूख आहे. दक्षिणेकडे राजे शहाजी दरवाजा तर उत्तरेकडे राष्ट्रमाता जिजाऊ महाद्वार आहे. संपूर्ण मंदिर ओवऱ्यांनी बंदिस्त आहे. तुळजाभवानीचे मुख्य मंदिर हे हेमाडपंथी शैलीत आहे. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, अर्धमंडप, सभामंडप अशी केली जाते.

♦  नळदुर्ग किल्ला : हा किल्ला जिल्हा मुख्यालयापासून 57 किमी अंतरावर आहे. नळदुर्गच्या उत्तरेस बोरी नदी वाहते. या नदीच्या जलाशयाचा उपयोग किल्ल्याच्या संरक्षणासाठी केलेला आहे. या किल्ल्याच्या भोवाती बोरी नदी फिरलेली आहे. या किल्ल्यात एकूण 12 तोफा आहेत. यापेकी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर 4 तोफा दिसतात. किल्ल्यावर हत्तीखाना, दारुगोळा पठार, धान्यकोठार, जोड इमारत, शिवकालीन इमारत, रंगमहाल, बारादारी राजवाडा, राणी महाल, तुरुंग कोठही अशा इमारती आहेत. या किल्ल्याच्या परिसरातील नर-मादीचा सांडवा प्रसिद्ध आहे.

♦  उस्मानाबाद जिल्ह्यात कसे पोहोचाल ?

उस्मानाबाद जिल्ह्यात पोहोचण्यासाठी रेल्वे, रस्ता तसेच हवाई मार्गाचे पर्याय उपलब्ध आहेत. जिल्ह्याच्या जवळचे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. उस्मानाबादपासून हे विमानतळ सुमारे 261 किमी आहे. तर जिल्ह्याला स्वत:चे रेल्वेस्टेशन असून त्याला उस्मानाबाद रेल्वेस्टेशन संबोधले जाते. उस्मानाबाद सोलापूरपासून 67 कि.मी., लातूरपासून 73 कि.मी., पंढरपूरपासून 109 कि.मी., बीडपासून 114 किलोमीटर, औरंगाबादपासून 204 कि.मी., औरंगाबादपासून 242 किलोमीटर अंतरावर आहे.

इतर बातम्या :

Special Story | औरंगजेबाची राजधानी, ताजमहलची प्रतिकृती, वेरुळ-अजिंठा लेण्यांचं वैभव, जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी

special story | नेमगिरीपासून ते संतांच्या भूमीपर्यंत, परभणी जिल्ह्याच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI