MPSC ची उद्या परीक्षा, केंद्रावर जाण्यापूर्वी नियम पाहा!

कोरोना काळात राज्य सेवा पूर्व परीक्षा होत असल्यानं उमेदवारांनी आयोगानं जाहीर केलेली नियमावली वाचणं गरजेचे आहे. (MPSC State Service Prelims guidelines rules )

MPSC ची उद्या परीक्षा, केंद्रावर जाण्यापूर्वी नियम पाहा!
एमपीएसी
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 4:19 PM

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा 2020 उद्या राज्यभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात हा परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोना काळात ही परीक्षा होत असल्यानं परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी केंद्रावर जाण्यापूर्वी काही नियम वाचणं आवश्यक आहे. कोरोना संदर्भात आयोगानं काही सूचना केल्या आहेत त्यांचं पालन करणं आवश्यक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा ही अधिकारीपदाची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांनी नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी उमेदवारांनी घेणं गरजेचे आहे. (Maharashtra Public Service Commission State Service Prelims candidates need to read guidelines and rules declared for exam)

आयोगाकडून कोरोना संदर्भात कार्यप्रणाली

  1. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरीता आयोगाकडून कार्यप्रणाली (Standard Operating Procedure SOP) तयार करण्यात आली आहे. कार्यप्रणाली प्रमाणे उमेदवारांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना किमान तीन पदरी कापडाचा मास्क (Mask) परिधान करणे अनिवार्य आहे.
  2. आयोगाकडून परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी (Pouch) असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्राकरीता करणे अनिवार्य आहे.
  3. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता (Cleanliness) तसेच आरोग्यास हितावह (Hygienic) वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे.
  4. कोरोनासदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी /कर्मचारी यांना त्वरीत कळवावे. अशा उमेदवारांना मुखपट, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप, इत्यादी बाबी समाविष्ट असलेले पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच, त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करण्यात येईल.
  5. शारीरिक/परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तिपत्रिका इत्यादी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
  6. परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारिरीक/परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे.
  7. वापरलेले टिश्यु पेपर, मुखपट, हातमोजे, संनिटाईझ पाऊच, इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीमध्ये टाकावेत.
  8. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना/आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे.

शारीरिक/परस्पर अंतराच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे व प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे.

प्रवेशपत्र आणि ओळखीच्या पुराव्याच्या प्रती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला बसणाऱ्या परीक्षार्थींनी आयोगाच्या वेबसाईटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन प्रिंटआऊट काढून सोबत ठेवावी. त्यासोबतच आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड आणि इतर ओळखपत्र ज्याला आयोगानं मान्यता दिलीय त्याची झेरॉक्स प्रत सोबत ठेवावी. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर तिथं तुमच्याकडून कोरोनासंदर्भातील नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. परीक्षा केंद्रावरील बैठक व्यवस्थेचा बोर्ड पाहताना इतर परीक्षार्थींकडून गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल याची खबरदारी घ्या. कोरोना संसर्ग वाढत असल्याचं दिसत असल्यानं मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा.

संबंधित बातम्या:

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा देताय, ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांत तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करा, मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

(Maharashtra Public Service Commission State Service Prelims candidates need to read guidelines and rules declared for exam)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.