Special Story | 81 टक्के साक्षर लोक, बंजारा समाजाची काशी पोहरादेवी मंदिर, जाणून घ्या वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती

| Updated on: Aug 27, 2021 | 7:09 AM

वाशिम जिल्हा हा विदर्भाच्या पूर्वेस स्थित आहे. याच्या उत्तरेला अकोला तर उत्तर-पूर्वमध्ये अमरावती जिल्हा आहे. तसेच दक्षिणेस हिंगोली, पश्चिमेला बुलडाणा तर पूर्वेस यवतमाळ हा जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 5,150 किमी आहे.

Special Story | 81 टक्के साक्षर लोक, बंजारा समाजाची काशी पोहरादेवी मंदिर, जाणून घ्या वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती
WASHIM DISTRICT
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला आपले असे वैशिष्य आहे. याच वैशिष्यामुळे आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्हा आपले वेगळेपण राखून आहे. या विशेष रिपोर्टमध्ये आपण वाशिम जिल्ह्याचा वेगळेपणा, त्याची विशेषता तसेच इतर माहिती जाणून घेणार आहोत. (washim district all information in marathi know about tourist places and temple)

वाशिम जिल्हा हा विदर्भाच्या पूर्वेस स्थित आहे. याच्या उत्तरेला अकोला तर उत्तर-पूर्वमध्ये अमरावती जिल्हा आहे. तसेच दक्षिणेस हिंगोली, पश्चिमेला बुलडाणा तर पूर्वेस यवतमाळ हा जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 5,150 किमी आहे. येथे वाशिम, कारंजा व मंगळूरपीर असे एकूण तीन महसूल विभाग असून सहा तालुके आहेत. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 12,97,160 एवढी आहे. तर लोकसंख्येची घनता 250 / किमी 2 अशी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जिल्ह्यात बरेच लोक साक्षर असून त्याचा दर 81.7 टक्के आहे.

वाशिम जिल्ह्यात एकूण सहा तालुके आहेत.

वाशिम

कारंजा

रिसोड

मालेगाव

मंगरूळपीर

मानोरा

जिल्ह्यातील तीर्थस्थळे

या जिल्ह्यात विशेष अशी पर्यटनस्थळं नाहीत. मात्र, येथे वेगवेगळ्या धर्माची तीर्थस्थळे आहेत. पोहरादेवी मंदिर, शिरपूर जैन मंदिर, गुरुदत्त मंदिर कारंजा, बालाजी मंदिर अशी त्याची काही उदाहरणे आहेत.

पोहरादेवी मंदिर : या ठिकाणाला बंजारा समाजाची काशी म्हटलं जातं. हे मंदिर मानोरा तालुक्यात स्थित आहे. या मंदिरात पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून ठिकठिकाणाहून लोक येतात. हे अतिशय प्राचिन असे मंदिर आहे. वाशिमपासून पोहरादेवी संस्थान 51 किलोमीटर अंतरावर आहे.

शिरपूर जैन मंदिर : हे एक जैन धर्मियांचे मंदिर असून या ठिकाणाला अतिशय पवित्र माणले जाते. दरवर्षी या ठिकाणी जैन धर्माचे लोक मोठ्या संख्येने येतात.

गुरुदत्त मंदिर कारंजा : श्री नृसिंह सरस्वती गुरुमहाराज हे भगवान दत्तात्रेयाचे दुसरे अवतार आहेत. त्यांचे जन्मस्थान कारंजा हे असून येथे गुरुदत्ताचे भव्य असे मंदिर आहे. स्वामींचा ज्या ठिकाणी जन्म झाला तो वाडा आजही सुस्थित आहे. या ठिकाणी बाल स्वरूप श्रीनृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे. बाकीच्या ठिकाणी स्वामींच्या फक्त पादुका आहेत. श्रीपत ब्रह्मानंद सरस्वतीस्वामी महाराजांनी या मंदिराची स्थापना 1934 मध्ये केलेली आहे.

बालाजी मंदिर : वाशिम जिल्ह्यातील हे एक अतिशय जुने मंदिर आहे. राज्यभरात याला अतिशय पवित्र असे स्थळ माणले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक येत असतात.

इतर बातम्या :

Special Story | औरंगजेबाची राजधानी, ताजमहलची प्रतिकृती, वेरुळ-अजिंठा लेण्यांचं वैभव, जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी

special story | नेमगिरीपासून ते संतांच्या भूमीपर्यंत, परभणी जिल्ह्याच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?