Special Story | कधीकाळी मुघलांचे राज्य, आता उपग्रहांशी संपर्क ठेवण्यासाठी सोयीचे ठिकाण, जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती

जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7718 चौ.कि.मी आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत जालना जिल्ह्याने राज्याच्या एकूण भागापैकी 2.51 % भाग व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 1.32 टक्के म्हणजेच 102.0 चौ.कि.मी क्षेत्रफळ शहरी भाग आहे.

  • Updated On - 7:30 am, Mon, 23 August 21 Edited By: सचिन पाटील Follow us -
Special Story | कधीकाळी मुघलांचे राज्य, आता उपग्रहांशी संपर्क ठेवण्यासाठी सोयीचे ठिकाण, जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती
JALANA DISTRICT

मुंबई : असं म्हणतात की प्रत्येक प्रदेशाची संस्कृती ही वेगळी असते. कोणत्याही प्रदेशाला स्वत:चं अस्तित्व असतं. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या बाबतीतदेखील असंच काहीसं आहे. हा जिल्हा मराठवाड्यातील एक भाग म्हणून ओळखला जात असला तरी त्याचे वेगळे वैशिष्य आहे. या जिल्ह्याला वेगळा असा इतिहास आहे. येथील बाजारपेठा तसेच मानवी जीवनपद्धतीमध्ये झालेला बदलदेखील मोठा रंजक आणि अभ्यास करण्यासारखा आहे. या स्पेशल स्टोरीमध्ये आपण याच जिल्ह्याविषयीची माहिती जाणून घेऊयात. (know all information of Jalna district in Marathi know about all Temple and Tourist places in detail)

♦ जिल्ह्याचे स्थान, भौगोलिक स्थिती

ठोबळमाणाने सांगायचे झाले तर हा जिल्हा मराठवाड्यातील असून तो महाराष्ट्रच्या मध्यभागी आहे. राज्याच्या मध्यभागी असल्यामुळे सरकारी यंत्रणांना या जिल्ह्यातून दळणवळण करणे सोयीचे आहे. याच कारणामुळे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील इंदेवाडी येथे उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ऊभारले आहे. या भूकेंद्रात अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी संपर्क ठेवणे हे साईचे जाते, म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7718 चौ.कि.मी आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत जालना जिल्ह्याने राज्याच्या एकूण भागापैकी 2.51 % भाग व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 1.32 टक्के म्हणजेच 102.0 चौ.कि.मी क्षेत्रफळ शहरी भाग आहे. तर उरलेला 98.68 टक्के भाग म्हणजेच 7616 चौ.कि.मी. क्षेत्रफळात ग्रामीण भाग आहे. म्हणजेच या जिल्ह्यात बहुतांश लोक हे ग्रामीण भागात राहतात.

♦ जिल्ह्यात एकूण 971 गावे

2011 च्या जनगणनेनुसार या जिल्ह्यात एकूण 971 गावे आहेत. यापैकी 963 गावे वस्ती असलेली व 8 ओसाड गावे आहेत. जिल्ह्यात 806 स्वतंत्र ग्रामपंचायती व 157 गटग्रामपंचायती आहेत. या आकडेवारीमध्ये काळानुसार बदल झालेला आहे. जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. त्यांची नावे भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा अशी आहेत. या जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, परतूर व मंठा या पाच ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे.

♦ जालना जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत

 भोकरदन

 जाफ्राबाद

जालना

बदनापूर

 अंबड

 घनसावंगी

 परतूर

 मंठा

♦ जालना जिल्ह्याची स्थापना कधी झाली ?

हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असून त्याची स्थापना 1 मे 1981 रोजी झाली. स्थापना केल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड हे चार तालुके तसेच परभणी जिल्ह्यातील परतूर एक तालुका असे एकूण पाच तालुके जालना जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले. जिल्‍हयाच्‍या पुर्वेस परभणी व बुलडाणा जिल्‍हा आहे. तर औरंगाबाद पश्‍चिम दीशेला असून जळगाव उत्‍तरेकडे आहे. दक्षीणेस बीड जिल्‍हा आहे.

♦ जालना जिल्ह्याचा इतिहास

जिल्ह्यातील जालना शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर पूर्वी माती आणि विटांच्या भिंतींनी पूर्णपणे सुरक्षित करण्यात आलेले होते. मात्र, आता या शहरात मुर्ती दरवाजा आणि हैद्राबाद दरवाजा असे फक्त दोन दरवाजे शिल्लक आहेत. राजा अकबराच्‍या काळामध्‍ये जालना हे शहर अकबरच्‍या एका अधिकाऱ्याला जहागीर म्हणून देण्यात आलेले होते. काही काळासाठी अबुल फजलने या ठिकाणी वास्‍तव्‍य केल्याची नोंद आहे. निजाम-उल-मुल्‍क असफ जहॉ याने या शहराबद्दल काही लिहून ठेवलेले आहे. यामध्ये त्याने औरंगाबादपेक्षाही हे शहर राहण्यासाठी पोषक असल्याचं म्हटलेलं आहे. तसेच 1725 साली त्याने काबिल खान याला जालना शहराच्या पूर्वेला एक किल्‍ला बांधण्‍यास सांगितले हेाते. या किल्ल्याचे नाव आज मस्‍तगड आहे.

जालना शहराचा जमीन महसूल मराठे गोळा करत असत. मात्र यामध्ये नेहमी बदल होत असे. मराठा सत्‍तेचे वर्चस्‍व कमी झाल्‍यानंतर शेवटी हैद्राबादच्‍या निजामाकडे या ठिकाणाची सत्‍ता गेली होती. पुढे 1855 मध्‍ये रोहीले आणी कंपनी सत्‍तेमध्ये लढाई झाली होती. या लढाईत दोन्‍ही बाजुचे साधारणतः 100 पेक्षा अधिक सैनिक मरण पावले किंवा जखमी झाले होते. नंतर या लढाईत रोहील्‍यांना शरणागती पत्‍कारावी लागली होती.

♦ जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, तीर्थस्थळे

या जिल्ह्याला जसा निजाम, मुघल तसेच मराठा शासकांचा इतिहास आहे, तसाच या जिल्ह्यामध्ये काही पर्यटन आणि तीर्थस्थळेसुद्धा आहेत. या जिल्ह्यात जांबसमर्थ, मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ, मत्‍स्‍योदरी देवी मंदिर, गुरू गणेश तपोधाम, श्री गणपती मंदीर, मस्तगड हे ठिकाण पाहण्यासारखे आहेत.

♦ जांबसमर्थ, घनसावंगी : हे ठिकाण धार्मिक स्थळ आहे. येथे संत रामदास स्वामी यांचा जन्म झाला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात हे ठिकाण आहे. येथे राम मंदिरामध्‍ये दरवर्षी राम नवमीनिमित्‍त यात्रा भरते. हे राम मंदिर रामदास स्वामी यांच्या घरात बांधण्यात आलेले आहे. समर्थ मंदिर हे संत रामदास स्‍वामी यांच्‍या आठवणीमध्‍ये बनविण्‍यात आलेले आहे.

मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ – मौलया नुरुद्दीन यांची समाधी मजार-इ-मौलया म्हणून ओळखली जाते. ती अंबड तालुक्यातील डोणगावात आहे. मौलया नुरुद्दीन यांना “वली अल-हिंद” (भारतीय प्रतिनिधी / काळजीवाहू) या पदावर “दाऊदी बोहरा दावत”, येमेन केंद्रातर्फे नियुक्त करण्यात आले होते. मौलया नुरुद्दीन हे शिक्षण घेण्यासाठी, कैरो, इजिप्त येथे गेले होते. त्यांचाच हा दर्गा आहे.

♦ मत्‍स्‍योदरी देवी मंदिर, अंबड- येथे मत्योदरी देवीचे भव्य मंदिर आहे. जालना शहराच्या दक्षिणेला 21 किमी अंतरावर हे मंदिर आहे. ज्या टेकडीवर देवीचे मंदिर आहे, त्याचा आकार हा मासोळीसारखा असल्यामुळे या मंदिराल मत्योदरी देवीचे मंदिर म्हटले जाते. हे मंदिर जवळपासच्‍या क्षेत्रातील अत्‍यंत जुन्‍या मंदिरांपैकी एक आहे. ऑक्‍टोबर महिन्‍यामध्‍ये नवरात्र महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने दरवर्षी या मंदिरामध्‍ये यात्रा भरते.

♦ गुरू गणेश तपोधाम- जैन धर्मियांसाठीचे हे एक पवित्र ठिकाण म्हणून ओळखले जाते. गुरु गणेश तपोधाम याला कर्नाटक केसरी म्हणूनदेखील ओळखले जाते. श्री वर्धमान स्‍थानकवासी जैन श्रावक संघ या जैन ट्रस्‍टमार्फत या धार्मिक स्‍थळाची देखरेख व निगा राखली जाते. या ट्रस्टमार्फत शालेय संस्‍थान, महाविद्यालय, अंधांची शाळा, ग्रंथालय, गोशाला चालविल्‍या जातात. संस्‍थानची गोशाला ही मराठवाड्यातील सर्वात मोठी गोशाला आहे.

♦ जालना किल्ला, जालना : निजाम उल मुल्क असफ जेह यांनी सन 1725 मध्ये शहराच्या पूर्वेला जालना किल्ला बांधण्यास सांगितले त्याला ‘मस्तगड’ म्हणून ओळखले जाते. किल्याच्या बांधकामावर फारसी शिलालेख आढळतात. या किल्ल्याचा आकार चतुष्कोणीय आहे. तसेच या किल्ल्याच्या कोपऱ्यात अर्ध परिपत्रक बुरुज आहेत.

♦ जिल्ह्यात कसे पोहोचाल ?

या जिल्ह्यात पोहोचण्यासाठी रेल्वे तसेच हवाई आणि रस्ते मार्ग उपलब्ध आहेत. हवाई मार्गाने यायचे असल्यास जालना शहरामध्ये प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध नाही. मात्र, सर्वात जवळचे विमानतळ चिकलठाणा औरंगाबाद हे आहे. जालना शहरापासून चिकलठाणा 64 किमी दूर आहे. रेल्वे सेवेद्वारे यायचे असल्यास नियमित रेल्वे गाड्या सहजपणे मिळतात. बस सेवेद्वारे या जिल्ह्यात येण्यासाठी देशातील प्रमुख शहरांमधून बससेवा उपलब्ध आहे.

इतर बातम्या :

Special Story | औरंगजेबाची राजधानी, ताजमहलची प्रतिकृती, वेरुळ-अजिंठा लेण्यांचं वैभव, जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी

special story | नेमगिरीपासून ते संतांच्या भूमीपर्यंत, परभणी जिल्ह्याच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

(know all information of Jalna district in Marathi know about all Temple and Tourist places in detail)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI