21 एप्रिलच्या रात्री सर्व इच्छा होतील पूर्ण! 9:9 मिनिटांनी करा असा उपाय
जर तुमच्या मनात अशी काही इच्छा असेल जी तुम्हाला पूर्ण करायची असेल तर विश्व तुम्हाला एक सुवर्णसंधी देत आहे. खरं तर, 21 एप्रिल 2025 च्या रात्री 9:9 मिनिटांनी खूप शक्तिशाली ऊर्जा सक्रिय होतील, ज्या दरम्यान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून, 21 एप्रिल 2025 हा दिवस खूप खास आहे कारण या दिवशी अवकाशात एक अद्भुत दृश्य दिसेल. अनेक वर्षांनंतर, 21 एप्रिल 2025 च्या रात्री, आकाशात दिसणारं दृश्य फार वेगळं असणार आहे. शास्त्रज्ञ या घटनेला लायरिड्स उल्कावर्षाव (Lyrids Meteor Shower) म्हणतात. तर धार्मिक तज्ज्ञांच्या मते, या दिवशी आकाशात अशा चांदण्या दिसतील, ज्यामुळे संपूर्ण विश्वातील शक्तिशाली ऊर्जा सक्रिय होतील.
शास्त्रांमध्ये असंम्हटले आहे की, जेव्हा विश्वातील सर्व शक्ती सक्रिय असतात, तेव्हा त्या वेळी केलेली इच्छा निश्चितच पूर्ण होते. अनेक वर्षांनंतर, जेव्हा 21 एप्रिल 2025 रोजी खूप शक्तिशाली ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या काळात काही उपाय केल्यानंतर सर्व इच्छा पूर्ण होतात असं देखील सांगितलं जात आहे.
View this post on Instagram
धार्मिक तज्ज्ञांच्या मते, 21 एप्रिल 2025 हा दिवस खूप शुभ आणि विशेष आहे. 2025 हे वर्ष फार चांगलं वर्ष आहे. दर 2+0+2+5 यांची बेरीज कराल तर उत्तर 9 येईल त्याचप्रमाणे तुम्ही 09:09 म्हणजे 0+9+0+9= 18 आणि 1+8 यांची बेरीज कराल तर उत्तर 9 येईल. अंक शास्त्रानुसार 9 हा अंक फार उत्तम आहे. म्हणून, 21 एप्रिल 2025 रोजी रात्री 09:09 वाजता सर्व ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय होतील. रहस्यमय आणि दैवी शक्ती सक्रिय होण्याची शक्यता आहे.
या गोष्टीची घ्या काळाजी
21 एप्रिल 2025 रोजी रात्री 09:09 वाजता आकाशाकडे पाहून मनातील इच्छा व्यक्त करा. इच्छा व्यक्त करताना डोळे उघडे ठेवा, हात जोडा. जर तुम्ही असं केलं तर विश्व नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल. पण तुम्ही सोमवारी कोणतीही इच्छा मागितली तरी ती पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका…. असं देखील सांगितलं जात आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
