असे नवरे नरकातच जातात, बायकोसोबत ती 5 कामे करणं म्हणजे महापापच; गरुड पुराण जे सांगत ते…
पतीने पत्नीला शारीरिक-मानसिक त्रास देणे, तसेच यासह काही कृत्य करणे टाळावे. ही कृत्ये केल्यास पतीला नरकवास भोगावा लागतो आणि पुढच्या जन्मातही त्रास सहन करावा लागतो. या लेखात या पाच कृत्यांचे विस्तृत वर्णन करण्यात आले आहे.

धार्मिक मान्यतांनुसार पती-पत्नीचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की पती-पत्नीच्या नात्यात लहानमोठं कोणीचं नसतं, जे लोक एकमेकांशी जुळवून घेतात, एकत्र मिळून काम करतात त्यांच दांपत्य जीवन सुखी असतं असं म्हणतात. शास्त्रामध्ये वैवाहिक जीवनाबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. यासोबतच अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, अशी काही कामं सांगितली आहेत,तशी वागणूक पतीने पत्नीला कधीच देऊ नये.
गरुड पुराण, मनुस्मृती आणि महाभारतानुसार कोणत्याही पतीने पत्नीसोबत अशी 5 कामं करू नयेत. या गोष्टी केल्या तर त्याला नरक भोगावा लागतो. तसेच त्याला पुढील आयुष्यातही समस्यांना सामोरे जावे लागते.पतीनेहे पत्नीशी कसं वागू नये हे जाणून घेऊया.
शारीरिक आणि मानसिक कष्ट
गरुड पुराणातील सातव्या अध्यायानुसार पतीने आपल्या पत्नीला शारीरिक किंवा मानसिक त्रास दिल्यास त्याला मृत्यूनंतर ‘रौरव नरकात’ पाठवलं जाते. रौरव नरकात रुरू नावाचे भयंकर साप आहेत, जे सतत पापी आत्म्याला दंश करतात. तर मनुस्मृतिनुसार जो पुरुष आपल्या पत्नीला दुखवतो त्याला पुढील जन्मात देखील त्रास होतो.
पत्नीला धोका देणं
गरुड पुराणातील 10 व्या श्लोकानुसार (यस्तु भार्यमपरित्यज्य परस्त्रिशु रमेत नरः। स कुमबिनिपाके गोरे पच्याटे कालसंत्या ॥) जो कोणी आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवतो त्याला मृत्यूनंतर कुंभिनीपाक नरकात टाकले जाते. तिथे यमदूत त्या आत्म्याला उकळत्या तेलात टाकतो आणि भयंकर यातना देतो.
अपमानित करणे
महाभारताच्या अनुशासन पर्वाच्या 88 व्या अध्यायात असे लिहिले आहे की जो कोणी आपल्या पत्नीचा अपमान करतो, तो मृत्यूनंतरही पुढील जन्मात दु:ख भोगतो. यासोबतच मनुस्मृतीनुसार स्त्रीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचे जीवन नरकासारखे होते.
भावनांकडे दुर्लक्ष करणं
जो पती आपल्या पत्नीच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो आणि तिच्यावर प्रेम करत नाही. किंवा जर एखाद्या पतीने पत्नीकडून जबरदस्ती काम करून घेतलं किंवा काम करण्यास भाग पाडलं तर केवळ त्याच्या शारीरिक जीवनातच नाही तर त्याच्या आध्यात्मिक जीवनातही त्याचे पतन होते. अशा व्यक्तीला घोर पाप लागतं.
अधिकार नाकारणे
जो पुरुष आपल्या पत्नीच्या हक्कांचे उल्लंघन करतो त्याला अनेक आयुष्यांसाठी गरिबी आणि नरक भोगावे लागते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
