AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराच्या दारात बसणाऱ्या श्वानाकडे दुर्लक्ष करू नका; धार्मिक मान्यतेत दडले आहे मोठे रहस्य

धार्मिक आणि लोकमान्यतानुसार घराच्या दारावर बसलेला श्वानाला विशेष महत्व दिले जाते. कारण तो निष्ठा आणि सतर्कतेचा प्रतीक म्हणून ओळखला जातो.

घराच्या दारात बसणाऱ्या श्वानाकडे दुर्लक्ष करू नका; धार्मिक मान्यतेत दडले आहे मोठे रहस्य
| Updated on: Jun 13, 2026 | 5:48 PM
Share

आपल्या घराच्या दारात किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एखादा श्वान नियमितपणे बसलेला दिसला तर अनेकजण त्याकडे साध्या प्राण्याच्या नजरेने पाहतात. मात्र सनातन धर्म, लोकमान्यता आणि तांत्रिक परंपरांमध्ये श्वानाला अत्यंत विशेष स्थान देण्यात आले आहे. धार्मिक श्रद्धेनुसार श्वान हा केवळ निष्ठा आणि सतर्कतेचे प्रतीक नसून तो घराचे रक्षण करणारा, नकारात्मक शक्तींना दूर ठेवणारा आणि काही प्रसंगी दैवी संकेत देणारा जीव मानला जातो.

धार्मिक मान्यतांनुसार भगवान भैरव यांचे वाहन श्वान आहे. त्यामुळे भैरव उपासनेत श्वानाला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक ठिकाणी अशी श्रद्धा आहे की एखादा श्वान जर एखाद्या घराच्या दारात नियमितपणे येऊन बसत असेल तर तो केवळ अन्न किंवा आश्रयाच्या शोधात आलेला नसतो. त्या घरातील सूक्ष्म ऊर्जा, वातावरण आणि तेथील लोकांशी त्याचा एक आध्यात्मिक संबंध निर्माण झालेला असू शकतो.

श्वान घराचे रक्षण करतो, अशी लोकमान्यता

शकुनशास्त्र आणि लोकपरंपरेत असे मानले जाते की काही श्वान हे पूर्वज, जुने मित्र किंवा गतजन्मातील आत्मीय व्यक्तींच्या चेतनेशी जोडलेले असू शकतात. अशा श्वानांचा त्या कुटुंबाशी विशेष संबंध असतो आणि ते घरातील संकटे, दुःख किंवा ग्रहदोषांचे परिणाम स्वतःवर घेण्याचा प्रयत्न करतात अशी श्रद्धा आहे.

लोकमान्यतेनुसार असे श्वान घराभोवती एक अदृश्य संरक्षण कवच निर्माण करतात. त्यामुळे अनेक भागांत श्वानांना अन्न देणे, पाणी पाजणे आणि त्यांच्याशी प्रेमाने वागणे हे पुण्यकर्म मानले जाते.

महाभारतातील श्वानाचे अद्वितीय स्थान

श्वानाच्या निष्ठेचे आणि धार्मिक महत्त्वाचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण महाभारतातील महाप्रस्थानिक पर्वात आढळते. पांडव जेव्हा हिमालयाच्या दिशेने अंतिम प्रवासासाठी निघाले होते, तेव्हा एक श्वान धर्मराज युधिष्ठिरांच्या सोबत अखेरपर्यंत राहिला. स्वर्गाच्या प्रवेशद्वाराजवळ देवांनी युधिष्ठिरांना त्या श्वानाला सोडून देण्यास सांगितले.

मात्र युधिष्ठिरांनी आपल्या आश्रयाला आलेल्या जीवाचा त्याग करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांच्या या धर्मनिष्ठेची परीक्षा घेण्यासाठी तो श्वान प्रत्यक्ष धर्मदेवाच्या रूपात आला होता. युधिष्ठिरांच्या करुणा, निष्ठा आणि धर्मपालनामुळे ते या परीक्षेत यशस्वी ठरले. हा प्रसंग आजही शरणागताचे रक्षण, सर्व जीवांप्रती करुणा आणि निष्ठेचे सर्वोच्च उदाहरण म्हणून सांगितला जातो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?