तुमच्या बाल्कनीतही ठेवल्यात का या 5 गोष्टी? आताच काढा अन्यथा तुमच्या प्रगतीत येतील अडथळे
वास्तुशास्त्रानुसार, अंगण आणि बाल्कनीबाबतही काही नियम पाळणे आवश्यक आहेत. जेणे करून त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही. जसं की घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत काही वस्तू ठेवणे कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. अन्यथा त्याचे परिणाम घरातही दिसू लागतात. तसेच प्रगतीत अडथळा येतो असे म्हटलं जाते. त्यासाठी काय करावं हे जाणून घेऊयात.

आपल्या सर्वांनाच माहित आही की वास्तुशास्त्राचे महत्त्व काय असते ते. वास्तुशास्त्रानुसार घराबाबत असा अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात ज्यांचे पालन केले तर नक्कीच वास्तूदोषापासून ते आयुष्यातील अडथळे दूर होण्यापर्यंत अनेक फायदे होतात. वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय हे जर योग्यरित्या पाळले तर त्याचा आपल्या जीवनावर खूप सकारात्मक परिणाम होतो.
वास्तुशास्त्रात अंगण आणि बाल्कनीबद्दलही अनेक नियम सांगण्यात आले आहेत
जेव्हा आपण त्या नियमांकडे दुर्लक्ष केलं तर, त्याचे परिणाम तितकेच वाईट होऊ शकतात. आपले वास्तुशास्त्र असेही म्हणते की घरात असलेली प्रत्येक वस्तू सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. जसं की स्वयंपाकघर असेल किंवा बेडरूममधील वस्तू असतील. त्यांच्यामुळेही अनेकदा परिणाम होतो. अनेकांना हे माहित नसेल की वास्तुशास्त्रात अंगण आणि बाल्कनीबद्दलही अनेक नियम सांगण्यात आले आहेत. अंगण आणि बाल्कनीमध्ये ठेवलेल्या अशा बऱ्याच वस्तू असतात ज्याचा थेट परिणाम घरातील वातावरणावर होत असतो.
अनेकदा लोक नकळत बाल्कनीलाच स्टोअर रूम बनवतात
परंतु अनेकदा लोक नकळत बाल्कनीलाच स्टोअर रूम बनवतात आणि अशा गोष्टी तिथे ठेवतात, ज्यामुळे कुटुंबाच्या प्रगतीत अडथळा येतो. जर या चुकीच्या गोष्टी तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीत देखील असतील तर त्या ताबडतोब काढून टाका अन्यथा त्याचा थेट तुमच्या जीवनावर, आरोग्य आणि नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकेल. चला तर मग या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या वास्तूशास्त्रानुसार अंगणात किंवा बाल्कनीमध्ये ठेवू नयेत.
तुटलेले सामान
अनेकदा आपण आपल्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुटलेली भांडी, जुने फर्निचर किंवा रद्दी ठेवतो. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. यामुळे घराचे सौंदर्यच बिघडत नाही तर प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात.
काटेरी रोपे
वास्तुशास्त्रानुसार, रोप किंवा लहान झाडं घराचे सौंदर्य वाढवतात आणि वातावरणात ताजेपणा आणतात, परंतु अंगणात किंवा बाल्कनीमध्ये कॅक्टस किंवा बाभूळ सारखी काटेरी झाडे ठेवणे अशुभ मानले जाते. या झाडांमुळे घरात भांडणे, तणाव आणि नातेसंबंधांमध्ये कटुता येऊ शकते. वास्तुनुसार, बाल्कनीमध्ये नेहमीच हिरवी आणि फुलांची झाडे लावावीत.
घाण आणि कचरा
घराची साफसफाई करताना बऱ्याचदा आपण बाल्कनीतील निरुपयोगी वस्तू काढायला विसरतो. त्यामुळे त्या वस्तू आणि त्यामुळे होणारा कचरा तिथेच साचून राहतो. घाण आणि कचरा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि त्यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनात अडथळे निर्माण होतात. घराचे अंगण आणि बाल्कनी नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे.
चपलांचा ढीग
वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते, घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात बूट आणि चप्पलांचा ढीग ठेवणे खूप अशुभ मानले जाते. असे केल्याने केवळ घाण पसरत नाही तर वास्तुदोषही वाढतात. हे टाळण्यासाठी, बूट आणि चप्पल नेहमी व्यवस्थित रॅकमध्ये किंवा घराबाहेर नीट लावून ठेवावेत.
भंगार लोखंड किंवा निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू
वास्तुशास्त्रानुसार, जर जुने पंखे, तुटलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा लोखंडी सामान अंगणात किंवा बाल्कनीत ठेवाल तर ते घराच्या प्रगतीत अडथळा आणते. वास्तुशास्त्रात, धातूचा कचरा नकारात्मक उर्जेचा स्रोत मानला जातो, त्यामुळे अशा खराब झालेल्या वस्तू घरातून ताबडतोब काढून टाकल्या पाहिजेत.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
