Chanakya Niti : शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले लक्षात ठेवा

चाणक्य नीतिमध्ये जीवनाशी संबंधित सर्व पैलू सांगितले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने त्यात लिहिलेल्या गोष्टींचे अनुसरण केले तर त्याला आयुष्यात नेहमीच यश मिळेल. चाणक्या यांनी नीतिशास्त्रात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या शत्रूचा पराभव करायचा असेल तर या गोष्टींचे अनुसरण करावे.

Chanakya Niti : शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले लक्षात ठेवा
chanakya Niti

मुंबई : आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि अभ्यासक होते. शिक्षणाला त्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते. चाणक्य यांनी अगदी लहान वयातच वेद आणि शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले होते. चाणक्य यांनी आपल्या मुत्सद्दीपणा आणि रणनीतिने आपल्या सर्वात मोठ्या शत्रू पद्मानंदचा पराभव केला आणि सामान्य चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवले. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहिले.

आचार्य चाणक्य नंतर तक्षशिलाच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनले. त्यांचे नीतिशास्त्र हे पुस्तक अजूनही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. चाणक्य नीतिमध्ये जीवनाशी संबंधित सर्व पैलू सांगितले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने त्यात लिहिलेल्या गोष्टींचे अनुसरण केले तर त्याला आयुष्यात नेहमीच यश मिळेल. चाणक्या यांनी नीतिशास्त्रात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या शत्रूचा पराभव करायचा असेल तर या गोष्टींचे अनुसरण करावे.

चाणक्य म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या शत्रूला कमी लेखण्याची चूक केली तर तो युद्ध आधीच हरला आहे असं समजा. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी व्यक्तीने काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा

आचार्य चाणक्य म्हणतात की शत्रूवर विजय मिळवण्यासाठी एखाद्याने आपली कमजोरी काय आणि शक्ती काय हे जाणून घेतले पाहिजे. आपल्या शत्रूच्या कारवायांकडे कधीही दुर्लक्ष करु नये. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर नेहमी नजर ठेवावी. शत्रूच्या प्रत्येक कृतीची जाणीव असली पाहिजे, तरच ती व्यक्ती जिंकू शकतो.

शत्रू शक्तीशाली असल्यास

आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुमचा शत्रू बलवान असेल तर तुम्ही त्याला बुद्धिमत्तेने पराभूत करा. जर तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा शक्तीशाली असेल तर त्या वेळी लपून राहणे आणि नंतर उत्तर देणे अधिक चांगले आहे, या काळात तुमच्या शक्ती शत्रूइतक्या वाढवा. आपल्या हितचिंतकांसह योजना बनवून मग आक्रमन करावे.

शत्रूला कमी लेखू नका

आपल्या शत्रूला कमकुवत समजण्याची चूक कधीही करु नका. बहुतेक लोक शत्रूला कमकुवत मानतात, ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. आपल्या शत्रूबद्दल आपल्याला माहित असले पाहिजे. शत्रूची कमकुवतता आणि ताकद नेहमी जाणली पाहिजे. तरच ती व्यक्ती आपल्या शत्रूवर विजय मिळवू शकेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | जर तुम्हाला सन्मान प्रिय असेल तर आजच या 3 सवयी सोडा

Chanakya Niti : या 3 गोष्टींमध्ये संयम बाळगणे अति आवश्यक असते, अन्यथा मोठं नुकसान भोगावं लागू शकते…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI