Chanakya Niti | श्रीमंत होण्यासाठी अंगी हे गुण असावे, आचार्य चाणाक्य काय म्हणतात जाणून घ्या…

चाणक्य नीति (Chanakya Niti) जीवनात धर्म, शांती आणि शिक्षाच्या प्रत्येक बाजूबद्दल शिक्षा देण्याचं काम करते.

Chanakya Niti | श्रीमंत होण्यासाठी अंगी हे गुण असावे, आचार्य चाणाक्य काय म्हणतात जाणून घ्या...
Acharya Chanakya
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 9:45 AM

मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या नीतिंबाबत आपण नमेहमीच वाचत असतो. पण बहुतेक लोक हे विचार अंमलात आणऊ शकत नाहीत. चाणक्य नीति (Chanakya Niti) जीवनात धर्म, शांती आणि शिक्षाच्या प्रत्येक बाजूबद्दल शिक्षा देण्याचं काम करतात. प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहातात (Acharya Chanakya Said Some Qualities To Become Rich In Life In Chanakya Niti).

अनेकजण श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत करतात तरीही त्यांना यश मिळत नाही. चाणक्य नीतिमध्ये श्रीमंत होण्यासाठी काय करावं हे सांगण्यात आलं आहे. त्यासोबतच हे देखील सांगण्यात आलं आहे की एका व्यक्तीमध्ये कुठले गुण असायला हवे, चला जाणून घेऊ त्याबद्दल –

उपार्जितानां वित्तानां त्याग एव हि रक्षणाम् तडागोदरसंस्थानां परीस्त्रव इवाम्भसाम्

चाणक्य सांगतात, व्यक्तीला श्रीमंत होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं असते. त्यांच्यामते सर्वातआधी व्यक्तीला माहिती असायला हवं की किती खर्च करायचा आहे आणि किती वाचवायचं आहे. जर पैशांचा योग्य वापर कसा करावा हे माहिती नसेल तर व्यक्ती गरीब बनतो. चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आलं आहे की वेळेवर पैशांचा वापर केला नाही तर त्याचं महत्त्व संपून जातं. जे लोक पैसे काहीही विचार न करता खर्च करतात ते बुद्धिहीन म्हणून ओळखले जातात. अनेकदा व्यक्तीच्या मुर्खपणामुळे त्यांना आर्थिक अडचणीची सामना करावा लागतो.

आचार्य चाणाक्य सांगतात की पैशांच्या देवाणघेवाण प्रकरणात व्यक्तीने संकोच बाळगी नये. अनेकदा संकोच केल्याने व्यक्तीला आपल्या पैशांपासून वंचित राहावं लागतं. गरज पडल्यास संकोच केल्याने पैशे घेतले नाही तर व्यक्तीला आर्थिक नुकसान होतं. ती व्यक्तीला हळूहळू गरीब होत जाते. त्यामुळे व्यक्तीला पैशांप्रती आपला व्यवहार स्पष्ट ठेवायला हवा.

पैशांचा लोभ झाल्यामुळे व्यक्तीमध्ये अहंकार निर्माण होतो. पैशांच्या लोभाने जे लोक मर्यादा ओलांडतात ते कधीच सुखी राहात नाही. पैशांच्या लोभाने माणसाचा अहंकारही वाढत जातो. चाणक्य धोरणानुसार आयुष्यात जोखीम घेणार्‍या लोकांना निश्चितच यश मिळते. जोखीम घेणारी व्यक्ती समस्यांना घाबरत नाही, तर त्याला सामोरे जाते.

शास्त्रांनुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या ध्येयाची जाणीव असली पाहिजे. जर व्यक्तीचे ध्येय निश्चित नसेल, तर त्याला यश मिळत नाही. चाणक्य धोरणाचे अनुसरण करणारे लोक म्हणतात की पैशांशी संबंधित गोष्टी लोकांना सांगू नये.

आचार्य चाणक्य यांनी सांगितले की देवी लक्ष्मीचे मन चंचल आहे. म्हणूनच ती बरेच दिवस कोणत्याही एका व्यक्तीबरोबर राहत नाही. त्यामुळे व्यक्तीला योग्य ठिकाणी पैसे खर्च करणे यायला हवं. चाणक्य म्हणतात की, चुकीच्या पद्धतीने मिळवलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. या पैशांमुले तुम्हाला भविष्यात अडचण निर्माण होऊ शकते.

Acharya Chanakya Said Some Qualities To Become Rich In Life In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : ‘या’ 4 गोष्टींची कधीही वाटू नये लाज, आताच बदला नाही तर दूर जातील लोक

Chanakya Niti : व्यक्तिच्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत या 4 गोष्टी, लक्षात असुद्या अन्यथा…

Chanakya Niti | जर तुम्ही ‘या’ तीन गोष्टी मानत असाल तर तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भासणार नाही

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.