Chanakya Niti | जर तुम्ही ‘या’ तीन गोष्टी मानत असाल तर तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भासणार नाही

Chanakya Niti | जर तुम्ही 'या' तीन गोष्टी मानत असाल तर तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भासणार नाही
Chanakya Niti

आचार्य चाणक्य हे नीति शास्त्र, समाज शास्त्र आणि अर्थ शास्त्राचे विद्वान होते (Chanakya Niti). त्यांनी आपल्या जीवन काळात अनेक अशा गोष्टी नीति शास्त्राच्या माध्यमातून सांगितल्या आहेत ज्यांचं अनुरण जर मनुष्याने आपल्या जीवनात केलं त्याच्या जीवनची दशा आणि दिशा दोन्हीबदलू शकते.

Nupur Chilkulwar

|

Apr 09, 2021 | 9:50 AM

मुंबई : आचार्य चाणक्य हे नीति शास्त्र, समाज शास्त्र आणि अर्थ शास्त्राचे विद्वान होते (Chanakya Niti). त्यांनी आपल्या जीवन काळात अनेक अशा गोष्टी नीति शास्त्राच्या माध्यमातून सांगितल्या आहेत ज्यांचं अनुरण जर मनुष्याने आपल्या जीवनात केलं त्याच्या जीवनची दशा आणि दिशा दोन्हीबदलू शकते. त्यांनी मनुष्याच्या प्रत्येक समस्येचं समाधान अगदी सुंदर पद्धतीने केलं आहे. त्यांच्या नीतिंमुळे मनुष्य आपल्या योग्य गंतव्य स्थानापर्यंत पोहोचू शकतात (Acharya Chanakya Said If You Respect These Three Things In Your Life Goddess Lakshmi Will Be happy In Chanakya Niti).

चाणक्य सांगतात की, जर मनुष्य आपल्या जीवनात या तीन प्रकारच्या लोकांचा सन्मान करतील तर त्यांच्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात असं काही व्हावं तर तुम्ही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टींचं स्मरण आणि अनुसरण करणेही गरजेचं आहे.

चाणक्य नीतिच्या तिसऱ्या अध्यायात 21 व्या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात –

मूर्खा यत्र पूज्यते धान्यं यत्र सुसंचितम्। दंपत्यो कलहो नास्ति तत्र श्री: स्वयमागत:।।

या श्लोकच्या माध्यमातून आचार्य चाणक्य सांगतात की, जिथे मुर्खांना सन्मान मिळत नसेल, जिथे धान्य चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवलं जात असेल आणि जिथे पती-पत्नी यांच्यात भांडण होत नसेल, तिथे लक्ष्मीजी स्वत: निवास करतात आणि धन-धान्याची कमतरता होत नाही.

विद्वानांचा आदर करा –

चाणक्य सांगतात की विद्वानांचा नेहमी आदर करायला हवा मुर्खांचा नाही. जे याची काळजी घेत नाहीत त्यांच्या आयुष्यात नेहमी कष्ट आणि संपत्तीची कमतरता राहाते. त्यामुळे असं करु नये.

धान्याचा सन्मान करा –

धान्याला देवी लक्ष्मीचं स्वरुप मानलं जातं. त्यामुळे धान्य वाया घालवणाऱ्यांवर देवी लक्ष्मी नेहमी क्रोधित राहाते. त्यामुळे ज्या घरात धान्याचा सन्मान होत नाही त्या घरात देवी लक्ष्मीचा वास राहात नाही. पण ज्या घरात धान्य काळजीपूर्वक ठेवलं जातं, तिथे नेहमी देवी लक्ष्मीचा निवास राहातो.

पती-पत्नीमध्ये भांडण होत नाही –

ज्या घरात पती-पत्नीमध्ये भांडण होत नाही आणि त्यांच्यामध्ये प्रेम राहातं, त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो, कारण पत्नीला गृह लक्ष्मी म्हटल्या गेलं आहे. त्यामुळे पतीमंनी नेहमी आपल्या पत्नीचा सन्मान करायला हवा.

Acharya Chanakya Said If You Respect These Three Things In Your Life Goddess Lakshmi Will Be happy In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lord Shree Krishna | जेव्हा एका भक्तासाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले! जाणून घ्या ही पौराणिक कथा…

Chanakya Niti | ‘या’ गोष्टी करण्यापासून एखाद्या व्यक्तीने कधीही लाजू नये, अन्यथा नुकसान होणार

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्यानुसार एका पुरुषामध्ये ‘हे’ चार गुण असायलाच हवे…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें