Chanakya Niti | या व्यक्तींच्या कर्माचे फळ तुम्हालाही भोगावे लागू शकते, नेहमी योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न करा

काही विशेष परिस्थितीत, तुम्हाला इतरांच्या कर्मांची शिक्षा देखील भोगावी लागते. कारण, तुमचे जीवन त्यांच्या कर्मांशी संबंधित असते. त्यामुळे अशा लोकांना नेहमी योग्य सल्ला दिला पाहिजे आणि त्यांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखले पाहिजे. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतिमध्ये अशाच काही लोकांचे वर्णन केले आहे.

Chanakya Niti | या व्यक्तींच्या कर्माचे फळ तुम्हालाही भोगावे लागू शकते, नेहमी योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न करा
स्वतःचे त्रास स्वत: पर्यंत ठेवा - चाणक्य नीतीनुसार, तुमच्या आयुष्यातील त्रास इतरांना शेअर करणे टाळले पाहिजे. तुमची समस्या जाणून घेतल्यानंतर लोक तुमची थट्टा करतील. तुम्हाला त्यांच्या कडून कोणतीच मदत होणार नाही.
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 7:48 AM

मुंबई : धर्मशास्त्रात कर्माच्या फळांबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जसे एखादी व्यक्ती कर्म करते, म्हणून त्याला त्याची फळे भोगावी लागतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीला योग्य कर्म करण्याचा आणि धर्माच्या मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु काही विशेष परिस्थितीत, तुम्हाला इतरांच्या कर्मांची शिक्षा देखील भोगावी लागते. कारण, तुमचे जीवन त्यांच्या कर्मांशी संबंधित असते. त्यामुळे अशा लोकांना नेहमी योग्य सल्ला दिला पाहिजे आणि त्यांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखले पाहिजे. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतिमध्ये अशाच काही लोकांचे वर्णन केले आहे (Acharya Chanakya Said You Have To Face Punishment For These People Karma ).

राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञ: पापं पुरोहित: भर्ता च स्त्रीकृतं पापं शिष्यपापं गुरुस्तथा

1. या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा एखाद्या राजाच्या राजवटीतील मंत्री, पुजारी किंवा सल्लागार आपले कर्तव्य नीट पार पाडण्यास सक्षम नसतात. तेव्हा त्या राज्याचा राजासुद्धा आपल्या कर्तव्यापासून दूर जातो. अशा परिस्थितीत तो अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. त्याच्या चुकीच्या निर्णयासाठी फक्त पुजारी, सल्लागार आणि मंत्री जबाबदार आहेत. अशा परिस्थितीत, राजाच्या चुकीच्या निर्णयांना त्याच्या राज्याशी संबंधित लोकांसह त्याच्या निष्पाप प्रजेला शिक्षा भोगावी लागते. त्यामुळे राजाला योग्य मार्ग दाखवणे हे राजाचे पुजारी, सल्लागार आणि मंत्री यांचे काम आहे. राजाला योग्य सल्ला देणे आणि त्याला चुकीचे करण्यापासून रोखणे हे त्याचे कर्तव्य आहे.

2. आचार्य म्हणतात की लग्नानंतर पती-पत्नीचे नातेच नाही तर त्यांचे जीवन देखील एकमेकांशी जोडले जाते. अशा परिस्थितीत जर एखादी पत्नी चुकीच्या गोष्टी करते, आपले कर्तव्य नीट पार पाडत नाही, तर तिच्या पतीलाही तिच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागते. त्याचप्रमाणे, जर कोणाचा पती व्यभिचारी असेल तर पत्नीला त्याच्या कर्माची शिक्षा भोगावी लागते. म्हणून दोघांनी नेहमी एकमेकांना योग्य मार्ग दाखवला पाहिजे.

3. चाणक्य सांगतात की, जर शिष्य चांगले काम करतो तर गुरुला प्रसिद्धी मिळते आणि जर त्याने चुकीचे कृत्य केले तर त्याचे परिणाम गुरुंनाही भोगावे लागतात. म्हणून, गुरुने आपल्या शिष्याला चुकीचे करण्यापासून रोखले पाहिजे आणि त्याला मार्गदर्शन केले पाहिजे.

Acharya Chanakya Said You Have To Face Punishment For These People Karma

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा, कधीही आर्थिक चणचण भासणार नाही

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून नेहमी दूर रहा, अन्यथा इतरांच्या निंदेस पात्र ठराल

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.