Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून नेहमी दूर रहा, अन्यथा इतरांच्या निंदेस पात्र ठराल

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आणि प्रतिकूल परिस्थितीतही अतिशय कठीण निर्णय घेतले. पण त्यांचे प्रत्येक निर्णय बहुतेक अचूक ठरले कारण आचार्य नेहमीच त्यांच्या संघर्षाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहात असत, धैर्याने आव्हानांना सामोरे जात असत आणि आपत्तीला संधीमध्ये बदलत असत

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून नेहमी दूर रहा, अन्यथा इतरांच्या निंदेस पात्र ठराल
Acharya_Chanakya

मुंबई : आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आणि प्रतिकूल परिस्थितीतही अतिशय कठीण निर्णय घेतले. पण त्यांचे प्रत्येक निर्णय बहुतेक अचूक ठरले कारण आचार्य नेहमीच त्यांच्या संघर्षाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहात असत, धैर्याने आव्हानांना सामोरे जात असत आणि आपत्तीला संधीमध्ये बदलत असत (Acharya Chanakya Said Do Not Do These Three Things If You Want To Avaoid Slander).

आचार्य चाणक्य यांनी जे काही केले ते त्यांनी जनहिताचे भान ठेवून केले आणि लोकांना नेहमी धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले. आचार्य यांचा असा विश्वास होता की ज्या कामात मानवी कल्याणाची भावना नसते, त्या कार्याचे फळ कधीच कायम राहू शकत नाही. चाणक्य नीति या ग्रंथात आचार्य यांनी लोकांना वाईट कृत्ये टाळण्याचा सल्ला दिला आहे. अपयश टाळायचे असेल तर नेहमी या 3 गोष्टींपासून दूर रहा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

खोटे बोलून फायदा घेणे

आचार्य चाणक्य यांच्यामते, जी व्यक्ती असत्याचा आधार घेऊन फायदा घेतो त्याला समाजात कधीही आदर मिळू शकत नाही. खोटे बोलून आपले काम काही दिवस चालू शकते, परंतु एखाद्या दिवशी आपले पितळ नक्कीच उघडं पडतं. ज्या दिवशी लोकांना आपले सत्य माहित होईल ते आपल्याला नापसंत करतील आणि आपल्यापासून दूर जातील.

इतरांबाबत वाईट बोलणे

काही लोकांना इतरांचे वाईट करणे आवडते. परंतु वाईट करणाऱ्यास कधीही आदराने पाहिले जात नाही. अशा लोकांमध्ये नकारात्मकता आणि निराशा दिसून येते. हे लोक जिथेही बसतात तिथे ते कोणाबाबत वाईट बोलतात. परंतु, इतरांबाबत वाईट बोलून आपण आपला अनमोल वेळच वाया घालवत नाही तर, स्वत: देखील टीकेचे पात्र ठरता.

दुसर्‍याचे नुकसान करण्यासाठी पैशांचा वापर

पैसा आपल्या जगण्यासाठी आहे, तो आपल्या वाईट काळाचा खरा मित्र आहे. म्हणून, पैसे जमा करणे आवश्यक आहे आणि त्याचा काही भाग धार्मिक कार्यातही वापरला जावा. परंतु काही लोक पैशांचा वापर इतरांचे नुकसान करण्यासाठी करतात. अशा लोकांना समाजात कधीही आदराने पाहिले जात नाही. लोकांना अशा लोकांसोबत राहाणे आवडत नाही. ते त्यांच्यापासून अंतर ठेवणे पसंत करतात.

Acharya Chanakya Said Do Not Do These Three Things If You Want To Avaoid Slander

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : या गोष्टी ठरतात एखाद्या व्यक्तीच्या वाईट काळाचे कारण, जाणून घ्या चाणक्य नीति काय म्हणते ते

Chanakya Niti | अत्यंत आदरणीय असतात हे 7 व्यक्ती, यांना चुकूनही पाय लावू नये

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI