AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्यांच्या ‘या’ 4 श्लोकांचा अर्थ आहे फार खोल, जीवनात ठरतील अत्यंत उपयोगी

आचार्य चाणाक्य यांनी चाणाक्य नीतीतून आयुष्य जगण्याचा खरा मार्ग सांगितला आहे. आचार्य चाणाक्य यांनी लिहिलेले चार श्लोक आहे, जे प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत मोलाचे ठरतील... तर जाणून घ्या ते श्लोक आणि त्यांचा अर्थ...

आचार्य चाणक्यांच्या 'या' 4 श्लोकांचा अर्थ आहे फार खोल, जीवनात ठरतील अत्यंत उपयोगी
| Updated on: Apr 22, 2026 | 2:09 PM
Share

Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी अनेक आयुष्यात घडणाऱ्या अनेक कठीण गोष्टी सोप्या करून सांगितल्या आहे. ज्यामुळे आजही त्यांची शिकवण मार्गदर्शक ठरत आहे. चाणाक्य यांनी अनेक श्लोक देखील लिहिले आहेत. ज्यांचे अर्थ फार खोल आहेत. आज चाणक्य नीतीमधील काही श्लोकांबद्दल जाणून घेऊ, जे नातेसंबंध दृढ करण्यास मदत करू शकतात. कारण आयुष्यात काही नाती फार महत्त्वाची असतात, तर काही नाती मोठा धडा शिकवतात… तर चाणाक्या यांनी लिहिलेल्या चार श्लोकांबद्दल जाणून घ्या…

रूपयौवनसम्पन्ना विशालकुलसम्भवाः। विद्याहीना न शोभन्ते निर्गन्धा इव किंशुकाः ॥

या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, सौंदर्य, तारुण्य आणि उच्च कुळात जन्म घेऊनही, जर एखाद्या व्यक्तीकडे ज्ञानाची कमतरता असेल, तर तो निरुपयोगी आणि अयोग्य आहे. म्हणून, जीवनसाथी निवडताना, एक गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे की, केवळ बाह्य सौंदर्य सर्वस्व नसतं. त्या व्यक्तीचा स्वभाव आणि गुणधर्म यांचाही विचार केला पाहिजे.

मूर्खाः यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसंचितम् । दाम्पत्योः कलहो नास्ति तत्र श्री स्वयमागता॥

चाणक्य नीतीच्या या श्लोकात सांगितल्या प्रमाणे, ज्या ठिकाणी किंवा घरात मूर्खांना मान दिला जात नाही, जिथे अन्नधान्य व्यवस्थितपणे साठवलं जातं आणि जिथे पती-पत्नीमध्ये भांडणे होत नाहीत, तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

माता यस्य गृहे नास्ति भार्या चाप्रियवादिनी। अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ॥

या श्लोकाचा अर्थ असा आहे की, ज्याच्या घरात आई किंवा जीवनसाथी नाही, त्याने वनात जावं, कारण त्याच्यासाठी घर आणि वन दोन्ही एकच आहेत. चाणक्यांचा मुद्दा असा आहे की, आपल्या जोडीदाराशी प्रेमाने बोलणं अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यशस्वी नातेसंबंध टिकवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च। व्याधितस्यौषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च॥

चाणाक्या यांच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, ज्याप्रमाणे औषध रुग्णाचा सर्वात चांगला मित्र आहे, त्याचप्रमाणे पती/पत्नी ही घरातील तुमची सर्वात चांगली मैत्रीण, मित्र असतो, जी तुमच्या दुःखात आणि संकटात तुम्हाला आधार देते. म्हणून, तुम्ही तुमच्या जोडीदाराचा नेहमी आदर केला पाहिजे… असं देखील चाणाक्य सांगतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय