Chanakya Niti | ‘या’ सहा जणांच्या मधून जाणं टाळा, चूक केल्यास पडेल खूप महागात

काही लोकांना अशी सवय असते की जर कोणी आपसात बोलत असेल तर ते विचार न करता त्यांच्या मधून निघून जातात. असे केल्याने केवळ आपली असभ्यता दिसून येत नाही तर ही कृती आपल्यासाठी समस्या वाढवू शकते. आचार्य चाणक्य यांनीदेखील अशा सहा गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामधून जाणे कठीण होऊ शकते Acharya Chanakya

Chanakya Niti | 'या' सहा जणांच्या मधून जाणं टाळा, चूक केल्यास पडेल खूप महागात
Acharya-Chanakya

मुंबई : काही लोकांना अशी सवय असते की जर कोणी आपसात बोलत असेल तर ते विचार न करता त्यांच्या मधून निघून जातात. असे केल्याने केवळ आपली असभ्यता दिसून येत नाही तर ही कृती आपल्यासाठी समस्या वाढवू शकते. आचार्य चाणक्य यांनीदेखील अशा सहा गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामधून जाणे कठीण होऊ शकते (Acharya Chanakya Warns To Pass Away Between These Six People May Stuck You In Trouble In Chanakya Niti).

विप्रयोर्विप्रवह्नेश्च दम्पत्यो: स्वामिभृत्ययो:
अन्तरेण न गन्तव्यं हलस्य वृषभस्य च

विद्वान आणि अधिकारी यांच्या मधून जाऊ नका

या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य म्हणतात की, जेव्हा दोन विद्वान लोक आपापसात बोलत असतात तेव्हा त्यांच्या मधून जाऊन त्यांच्या संभाषणात अडथळा आणू नये, अन्यथा त्या व्यक्तीला त्यांचा राग सहन करावा लगू शकतो.

ब्राह्मणांमधून जाऊ नका

जेव्हा ब्राह्मण आपापसात बोलत असतात आणि कोणी त्यांच्या मधून निघते तेव्हा ते त्याला अपमान मानतात. मान्यता आहे की असे केल्याने तुमचे सत्कर्म नष्ट होऊ शकतात. ब्राह्मणांच्या मधून बाहेर निघाल्यावर ज्ञान आणि संपत्तीचे नुकसान देखील होऊ शकते.

आगीतून जाऊ नका

आगीच्या मध्यभागी चालणे म्हणजे स्वतःला धोक्यात आणणे. यामुळे आग ओलांडल्याचा दोष तर लागतोच, त्याशिवाय भाजण्याचा धोकाही असतो.

पुरुष आणि स्त्री यांच्यामधून जाऊ नका

जर एखादा पुरुष-स्त्री किंवा नवरा-बायको आपापसात बोलत असतील तर त्यांच्या मधून जाणे असभ्यपणा माणला जातो. कदाचित ते आपापसांत काही गुप्त चर्चा करीत असतील. असे केल्याने आपल्याला त्यांचा राग सहन करावा लागू शकतो.

मालिक आणि मोकर यांच्यामधून जाऊ नका

जेव्हा जेव्हा मालिक आणि नोकर एकमेकांशी चर्चा करता असतात, तेव्हा ते बहुतेकदा गुप्त विषयावर चर्चा करत असतात. अशा परिस्थितीत आपण त्यांच्यामधून गेल्यास आपल्याला त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही तिथे कर्मचारी असाल तर तुम्हाला तुमची नोकरीदेखील गमवावी लागू शकते.

जनावरांच्या मधून जाऊ नका

जेव्हा जनावरांचा कळप जात असेल तेव्हा त्यांच्या मधून जाण्याची चूक करु नका. असे केल्याने आपण मोठ्या संकटात पडू शकता किंवा आपल्यालाही दुखापत होऊ शकते.

Acharya Chanakya Warns To Pass Away Between These Six People May Stuck You In Trouble In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | कितीही घट्ट मैत्री असली तरी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…

Chanakya Niti | या चार व्यक्तींशी चुकूनही वैर घेऊ नका, अन्यथा आयुष्य उद्ध्वस्त होईल…

Chanakya Niti | कठीण काळात जेव्हा कुठलाही मार्ग सापडत नसेल तेव्हा चाणक्य यांचे हे 7 विचार तुमचं मार्गदर्शन करतील

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI