Chanakya Niti | कितीही घट्ट मैत्री असली तरी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…

जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीशी मैत्री झाली तर ते संपूर्ण आयुष्य नष्ट करते. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतिमध्ये मैत्रीसंदर्भातील धोरणात काही गोष्टी सांगितल्या आहेत (Acharya Chanakya Never Forget These Two Things In Friendship In Chanakya Niti).

Chanakya Niti | कितीही घट्ट मैत्री असली तरी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा...
Acharya_Chanakya

मुंबई : मैत्रीचे नाते खूप सुंदर असते (Acharya Chanakya). जर एखादा मित्र खरा असेल तर तो प्रत्येक परिस्थितीत तुमचे समर्थन करतो, तुम्हाला योग्य मार्ग दाखवितो. परंतु जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीशी मैत्री झाली तर ते संपूर्ण आयुष्य नष्ट करते. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतिमध्ये मैत्रीसंदर्भातील धोरणात काही गोष्टी सांगितल्या आहेत (Acharya Chanakya Never Forget These Two Things In Friendship In Chanakya Niti).

आचार्य चाणक्य एक महान विद्वान मानले जातात. त्यांनी जीवनातील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला आणि आजीवन लोकांना मदत केली आणि त्यांना योग्य मार्ग दाखविला. चाणक्य नीतिमध्ये आचार्य यांनी लिहिलेल्या गोष्टींचे अनुसरण करून जीवनातील सर्व समस्या टाळता येतात.

परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्ष प्रियवादिनम्
वर्जयेत्तादृशं मित्रं विषकुंभम् पयोमुखम्

चाणक्य नीतिच्या मते असे बरेच मित्र आहेत जे तोंडावर खूप गोड बोलतात आणि पाठीमागे वाईट काम करतात. असे लोक खूप धोकादायक असतात. त्यांच्या बोलण्यात अडकू नका. असे लोक भविष्यात आपल्यासाठी एक मोठे संकट ठरु शकतात आणि आपले आयुष्य देखील नष्ट करु शकतात. हे लोक एका घागरीसारखे आहेत जे दुधाने भरलेले दिसतात, परंतु त्यांच्या आत विष भरलेले असते. त्यांच्यापासून दूर राहणेच चांगले.

न विश्वसेत् कुमित्रे च मित्रे चाऽपि न विश्वसेत्
कदाचित् कुपितं मित्रं सर्वं गुह्यं प्रकाशयेत्

याशिवाय चाणक्य नीतिच्या दुसऱ्या अध्यायातील सहाव्या श्लोकात आचार्य यांनी इशारा देत लिहिलं आहे की कुममित्रावर कधीही विश्वास ठेवू नये. पण सुमित्र म्हणजेच तुमची चांगली मैत्रीण असलेल्या मित्रावर कधीही त्याच्यावरही अतिविश्वास ठेवू नये किंवा त्याला आपल्या गुप्त गोष्टी कधीही सांगू नये. कारण, भविष्यात आपले त्या मित्राशी कधी भांडण झाले तर त्याच्याजवळ आपले सर्व रहस्ये असतील आणि कोणत्याही वेळी त्याचा गैरवापर करुन तो आपल्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करु शकतो.

Acharya Chanakya Never Forget These Two Things In Friendship In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या चार व्यक्तींशी चुकूनही वैर घेऊ नका, अन्यथा आयुष्य उद्ध्वस्त होईल…

Chanakya Niti | कठीण काळात जेव्हा कुठलाही मार्ग सापडत नसेल तेव्हा चाणक्य यांचे हे 7 विचार तुमचं मार्गदर्शन करतील

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून व्यक्ती कधीही समाधानी होत नाही, त्याचा लोभ वाढतच जातो

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI