AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adhikmas 2026: 15 जून रोजी अधिकमास संपणार, 25 जुलैच्या आता आटपून घ्या शुभ कार्य; कारण…

अधिकमास 15 जून रोजी संपणार नाही. दर तीन वर्षांनी अधिकमास येतो. त्यामुळे त्याचं धार्मिक महत्त्व आहे. असं असातना 19 जूनपासून शुभं कार्य सुरू होतील. पण 25 जुलैपूर्वी शुभ कार्य आटपणं भाग आहे. कारण 25 जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे.

Adhikmas 2026: 15 जून रोजी अधिकमास संपणार, 25 जुलैच्या आता आटपून घ्या शुभ कार्य; कारण...
15 जून रोजी अधिकमास संपणार, 25 जुलैच्या आता आटपून घ्या शुभ कार्य; कारण...Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 12, 2026 | 9:55 PM
Share

ज्येष्ठ अधिकमास सुरू असून 17 मे ते 15 जून असा कालावधी आहे. या महिन्याला पुरूषोत्तम मास असंही संबोधलं जातं. हा महिना भगवान विष्णुंना समर्पित असल्याने त्याला अधिकमास असं बोललं जातं. अधिकमासात पवित्र स्नान, दान, जप, तप आणि साधनेचं महत्त्व आहे. या महिन्यात अशी कामं केल्यास त्याचं पुण्य अधिक पटीने मिळते. अधिकमासात विवाह, मुंज, गृहप्रवेस किंवा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. 15 जूनपासून मूळ ज्येष्ठ मास सुरू होईल. त्यामुळे पुन्हा एकदा शुभ कार्य करू शकता. पण 25 जुलै आधी सर्व शुभ कार्य पूर्ण करावी लागणार आहेत. त्याला धार्मिक कारण आहे. 25 जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासात म्हणजेच चार महिन्यांच्या कालावधीत अनेक व्रतकैवल्य असतात.

चातुर्मासात काय असतं?

चातुर्मासात सृष्टीचा पालनकर्ता असलेले भगवान विष्णु योगनिद्रेत जातात. या काळात भगवान विष्णु योगनिद्रा आणि विश्राम अवस्थेत असतात. त्यामुळे चातुर्मासात शुभ आणि मंगळ कार्य केली जात नाहीत. चातुर्मासात आरोग्याच्या आणि अध्यात्मिक दृष्टीने ऋतूनुसार आहाराचे कठोर नियमही सांगितले गेले आहेत. या चार महिन्यात वांगी, कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य असते. चातुर्मास देवशयनी एकदशीपासून सुरू होतो. म्हणजे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरूवात होते आणि देवउठनी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. पंचांगानुसार, चातुर्मास 25 जुलै 2026 पासून सुरू होतो. हा कालावधी 119 दिवसांपर्यंत असेल आणि 20 नोव्हेंबर 2026 रोजी कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला संपेल. 25 जुलैला चातुर्मास सुरू झाल्यानंतर या कालावधीत म्हणजेच 119 दिवसांच्या कालावधीत शुभ आणि मंगळ कार्य केली जात नाहीत. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू जागे झाल्यानंतरच सर्व शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात.

अधिकमास संपल्यानंतर शुभ मुहूर्त

अधिकमास संपल्यानंतर 19 जूनपासून शुभ आणि मंगळ कार्य करण्याची सुरूवात होईल. ज्योतिष्यांच्या मते, 19 जूनपासून विवाहासाठी शुभ मुहूर्त आहेत. अधिक मास संपल्यानंतर 19, 21, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 जून रोजी विवाह मुहूर्त आहे. तर पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात 4 शुभ मुहूर्त आहेत. जुलै महिन्यात 1, 6, 7 आणि 11 जुलैला विवाहासाठी शुभ मुहूर्त आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा