AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amarnath yatra 2022: तीन लाख भाविकांनी केली अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी; अशी असेल यंदाची अमरनाथ यात्रा

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत 30 जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी (Amarnath yatra 2022) दक्षिण काश्मीरमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत सुमारे 3 लाख यात्रेकरूंनी नोंदणी (registration) केली आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाने (shri amarnath shrine board) आपल्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे.  अमरनाथ यात्रेसाठी प्रवाशांची पहिली तुकडी जम्मूहून 30 जूनला […]

Amarnath yatra 2022: तीन लाख भाविकांनी केली अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी; अशी असेल यंदाची अमरनाथ यात्रा
| Updated on: Jun 27, 2022 | 11:09 AM
Share

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत 30 जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी (Amarnath yatra 2022) दक्षिण काश्मीरमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत सुमारे 3 लाख यात्रेकरूंनी नोंदणी (registration) केली आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाने (shri amarnath shrine board) आपल्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे.  अमरनाथ यात्रेसाठी प्रवाशांची पहिली तुकडी जम्मूहून 30 जूनला निघणार आहे. अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचा (Terror attack) धोका लक्षात घेता कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी “त्रिनेत्र सुरक्षा कवच” तयार केले आहे, जे प्रत्येक धोक्याला तोंड देण्यास सक्षम आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान प्रत्येक कोपऱ्यावर ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार असून एक नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. दहशतवादाचा धोका लक्षात घेता श्रीनगर ते बालटाल या प्रवासाच्या दोन्ही बाजूंच्या डोंगराळ भागात सीआरपीएफच्या चौक्याही बांधण्यात आल्या आहेत.

श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड करते यात्रेचे व्यवस्थापन

दरवर्षी अमरनाथ यात्रेचे व्यवस्थापन श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड करते. अमरनाथ यात्रा दक्षिण काश्मीरमधील पहलगाममधील पारंपारिक 48 किमी नुनवान आणि मध्य काश्मीरमधील गंदरबलमधील 14 किमी लहान बालटाल या दोन मार्गांनी सुरू होईल. कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षांच्या खंडानंतर ही पवित्र यात्रा सुरू करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसाठी देशभरातील विविध बँकांच्या 566 नियुक्त शाखांद्वारे नोंदणी सुरू आहे.

मुस्लिम मेंढपाळाने शोधली होती अमरनाथ गुहा

अमरनाथ यात्रेला हिंदू यात्रेकरूंसाठी विशेष महत्त्व आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम गावातील एका मुस्लिम कुटुंबाने अमरनाथ गुहेचा शोध लावला होता. या घरातील एका मेंढपाळाने ही गुहा शोधून काढल्याचे मानले जाते. अमरनाथ गुहा हे भगवान शिवाच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. अमरनाथला तीर्थक्षेत्र म्हटले जाते कारण येथेच भगवान शिवाने माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते.

यात्रेत अशी असणार जेवण्याची व्यवस्था

अमरनाथ यात्रेदरम्यान यावेळी तळलेले पदार्थ, जंक फूड, गोड पदार्थ, चिप्स, समोसे यांसारख्या वस्तू लंगरमध्ये मिळणार नाहीत. अशा डझनभर गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. ओम शिवशक्ती सेवा मंडळाच्या सचिव रिंकू भटेजा यांनी सांगितले की, यात्रेदरम्यान भाविकांचे आरोग्य लक्षात घेता अमरनाथ श्राइन बोर्डाने लंगरांमध्ये केवळ पौष्टिक अन्नच वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांना काही प्रमाणात सुका मेवा व्यतिरिक्त फक्त हिरव्या भाज्या, कोशिंबीर, मक्याची पोळी, साधी मसूर, कमी चरबीयुक्त दूध आणि दही यांसारखे पौष्टिक पदार्थ द्यावेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार घेतलेल्या या निर्णयात आरोग्यदायी आहारामुळे भाविकांचे आरोग्य चांगले राहील, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, श्री अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या मार्गावरील हवामानात सातत्याने बदल होत असून, दोन दिवसांपासून बर्फवृष्टी सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रवास सुरू होण्यास विलंब होऊ शकतो. यावेळी 7 लाखांहून अधिक भाविक पोहोचण्याची अपेक्षा श्राइन बोर्डाने व्यक्त केली आहे. 2019 मध्ये एकूण 3.5 लाख भाविक पोहोचले होते. यावेळी ही यात्रा 30 जूनपासून सुरू होणार असून ती 11 ऑगस्टपर्यंत (रक्षाबंधन) चालणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.