AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amavasya December 2023 : या तारखेला आहे 2023 ची शेवटची अमावस्या, पूजा विधी आणि महत्त्व

धार्मिक ग्रंथांनुसार, सत्ययुगात, मार्ग-शीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला देवांनी वर्ष सुरू केले. विष्णु पुराणानुसार या अमावस्येला व्रत, स्नान आणि दान केल्याने पितरांसह ब्रह्मा, इंद्र, सूर्य, अग्नी, पशु, पक्षी आणि सर्व भूते तृप्त आणि प्रसन्न होतात. कार्तिक महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीची पूजा करून ज्याप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे देखील शुभ मानले जाते.

Amavasya December 2023 : या तारखेला आहे 2023 ची शेवटची अमावस्या, पूजा विधी आणि महत्त्व
अमावस्याImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 29, 2023 | 10:46 AM
Share

मुंबई : 2023 च्या शेवटच्या अमावस्येला विशेष महत्व आहे. कारण ती कार्तिक महिन्यात येते, तिला कार्तिक अमावस्या असेही म्हणतात. कार्तिक महिना सुरू झाला आहे. कार्तिक अमावस्येच्या (Kartik Amavasya 2023) दिवशी तीर्थस्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात तीर्थस्नान करणाऱ्यांना जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते आणि सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. याशिवाय या अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते. यावर्षी 2023 ची कार्तिक अमावस्या देखील पितरांच्या पूजेचा दिवस मानली गेली आहे. असे मानले जाते की या दिवशी तर्पण आणि पिंड दान अर्पण केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. कार्तिक अमावस्या ही 2023 सालची शेवटची अमावस्या असेल. कार्तिक अमावस्या 12 डिसेंबर 2023 रोजी आहे. हा दिवस मंगळवार असल्याने या दिवसाला भौमवती अमावस्या असेही म्हटले जाईल. मंगळवार अमावस्येला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होतो. या दिवशी पितृपूजनासह हनुमान आणि मंगळाची पूजा केल्याने मंगळ ग्रहामुळे होणारे दोषही दूर होतात.

पंचांगानुसार, कार्तिक अमावस्या 12 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 06:24 पासून सुरू होईल आणि 13 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 05:01 पर्यंत सुरू राहील. या अमावस्येला जर कोणाला स्नान करायचे असेल तर सकाळी 05.14 ते 06.09 पर्यंत स्नानाचा शुभ मुहूर्त असेल. याशिवाय पितृपूजेचा शुभ मुहूर्त 11.54 ते दुपारी 12.35 पर्यंत असेल.

कार्तिक अमावस्येचे लाभ

ज्योतिषी पराग कुळकर्णी सांगतात की ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे, मुलांकडून सुखाची कमतरता आहे किंवा नवव्या घरात राहू दुर्बल आहे, त्यांनी मार्गशीर्ष अमावस्येला व्रत अवश्य पाळावे. यामुळे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक फायदा होतो. तसेच या अमावस्येला तुळशीच्या मुळाने स्नान करावे. यामुळे भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना दुःखातून मुक्त करतात.

वर्षातील शेवटच्या अमावस्येचे महत्त्व

धार्मिक ग्रंथांनुसार, सत्ययुगात, मार्ग-शीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला देवांनी वर्ष सुरू केले. विष्णु पुराणानुसार या अमावस्येला व्रत, स्नान आणि दान केल्याने पितरांसह ब्रह्मा, इंद्र, सूर्य, अग्नी, पशु, पक्षी आणि सर्व भूते तृप्त आणि प्रसन्न होतात. कार्तिक महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीची पूजा करून ज्याप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे देखील शुभ मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...