Pradosh Vrat 2021 | आषाढ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी

प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला पाळला जातो. हा दिवस शिवभक्तांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. धर्मग्रंथानुसार प्रदोष व्रताचे नाव आणि महत्त्व त्या दिवसानुसार असते (Ashad Month First Pradosh Vrat 2021 Know The Tithi And Shubh Muhurat )

Pradosh Vrat 2021 | आषाढ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी
Shiv_Parvati
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jun 27, 2021 | 9:47 AM

मुंबई : प्रदोष व्रत (Pradosh Vrat 2021) प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला पाळला जातो. हा दिवस शिवभक्तांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. धर्मग्रंथानुसार प्रदोष व्रताचे नाव आणि महत्त्व त्या दिवसानुसार असते (Ashad Month First Pradosh Vrat 2021 Know The Tithi And Shubh Muhurat).

आषाढ महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत 7 जुलै 2021 रोजी बुधवारी आहे. बुधवारचा प्रदोष बुध प्रदोष व्रत म्हणूनही ओळखला जातो. मान्यता आहे की भोलेनाथ आपल्या भक्तांची भक्ती पाहून खूप लवकर प्रसन्न होतात. महादेव मनुष्य, राक्षस, भुत, यक्ष इत्यादींचे आराध्य आहेत. चला प्रदोष व्रतचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा पद्धत जाणून घेऊया –

प्रदोष व्रत शुभ मुहूर्त

🔶 प्रदोष व्रत आरंभ – 7 जुलै दुपारी 01:02 वाजता

🔶 प्रदोष व्रत समाप्त – 8 जुलै 2021 रोजी पहाटे 3.20 वाजता

🔶 भगवान शिवच्या पूजेचा शुभ मुहूर्त – संध्याकाळी 07:12 ते 09:20

प्रदोष व्रत पूजा पद्धत

✳️ शास्त्रानुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते.

✳️ प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प करावा.

✳️ या दिवशी भाविक निर्जल किंवा फलाहार उपवास ठेवतात.

✳️ भांग, धतुरा, बेलपात्र, फुले आणि जलने भगवान शंकरांचा अभिषेक करावा.

✳️ पूजेवेळी देवी पार्वतीला लाल ओढणी आणि श्रृगांराच्या वस्तू अर्पण कराव्यात.

✳️ विधीवत शिव पार्वतीची पूजा केल्याने कुटुंबातील सर्व त्रास दूर होतात.

प्रदोष व्रताचे महत्त्व

मान्यता आहे की, प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव प्रसन्न होतात आणि कैलासमध्ये तांडव करतात आणि सर्व देवी-देवता त्यांची स्तुती करतात. म्हणून प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा केल्याने आणि उपवास केल्याने भोलेनाथ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा केली जाते. या दिवशी उपवास केल्याने भोलनाथ तुमचे सर्व त्रास दूर करतात. तसेच, घरात सुख-समृद्धी नांदते.

Ashad Month First Pradosh Vrat 2021 Know The Tithi And Shubh Muhurat

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…

Ashadha Month 2021: मनोकामना पूर्ण करणाऱ्या आषाढ महिन्याला सुरुवात, जाणून घ्या त्याचं महत्व?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें