Ashadha Amavasya 2021 | आषाढ अमावस्या कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधि आणि महत्व

आषाढ महिन्याची अमावस्या खूप फायदेशीर मानली जाते. या अमावस्येला हलहारिणी आणि आषाढी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. या अमावस्येच्या दिवशी शेतकरी नांगर आणि शेतात वापरणाऱ्या वस्तूंची पूजा करतात. हा महिना शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा असतो. या दिवशी शेतकरी पूजो करतात आणि चांगल्या पिकांसाठी प्रार्थना करतात (Ashadha Amavasya 2021 Know The Tithi Shubh Muhurat And Importance Of This Day).

Ashadha Amavasya 2021 | आषाढ अमावस्या कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधि आणि महत्व
Ashadha Amavasya 2021
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 8:29 AM

मुंबई : अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे (Ashadha Amavasya 2021). अमावस्या तिथी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तारखेला येते. परंतु धार्मिक महत्त्वानुसार आषाढ महिन्याची अमावस्या खूप फायदेशीर मानली जाते. या अमावस्येला हलहारिणी आणि आषाढी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. या अमावस्येच्या दिवशी शेतकरी नांगर आणि शेतात वापरणाऱ्या वस्तूंची पूजा करतात. हा महिना शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा असतो. या दिवशी शेतकरी पूजो करतात आणि चांगल्या पिकांसाठी प्रार्थना करतात (Ashadha Amavasya 2021 Know The Tithi Shubh Muhurat And Importance Of This Day).

पूर्वजांच्या श्राद्धासाठीही अमावस्येचा दिवस खूप महत्वाचा आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि पूर्वजांच्या तर्पणासाठी दान केले जाते. आषाढ महिन्याचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व याबद्दल जाणून घ्या –

आषाढ अमावस्येचा शुभ मुहूर्त

यावेळी आषाढ महिना 25 जून रोजी कृष्ण पक्षाच्या प्रतिपदाच्या तिथीपासून सुरु झाला. यावेळी अमावस्या तिथी 9 जुलै 2021 रोजी सकाळी 05 वाजून 16 मिनिटांपासून ते 10 जुलै रोजी सकाळी 06 वाजून 46 मिनिटांपर्यंत असेल.

अमावस्या पूजेची पद्धत

अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तात स्नान करावे. यानंतर भगवान सूर्याला अर्घ्य द्या आणि नंतर पूजा करा आणि पितरांचं तर्पण करा. या दिवशी विधीवत पितरांची उपासना करा. काही लोक पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी उपवासही ठेवतात. ब्राह्मणांना भोजन द्या. यानंतर दान-दक्षिणा द्या.

अमावस्येचे महत्त्व

शास्त्रात अमावस्येचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो. या दिवशी लोक पवित्र नदीत स्नान करतात आणि पितरांना तर्पण करतात. या दिवशी अनेक लोक पितृ दोषातून मुक्त होण्यासाठी शुभ अनुष्ठान करतात. हा दिवस पूर्वजांच्या कर्म आणि श्राद्धासाठी खूप महत्वाचा आहे.

आषाढ अमावस्येवर हे उपाय करा

अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी व्रत ठेवा आणि गरिबांना दान आणि दक्षिणा द्या. या दिवशी सकाळी आंघोळ केल्यावर, पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा. या खास दिवशी गरजूंना अन्न, कपडे इत्यादी दान करावे.

Ashadha Amavasya 2021 Know The Tithi Shubh Muhurat And Importance Of This Day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ashadha Month 2021: मनोकामना पूर्ण करणाऱ्या आषाढ महिन्याला सुरुवात, जाणून घ्या त्याचं महत्व?

Sankasthi Chaturthi 2021 : आषाढ महिन्याची पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.