AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज आकाशात दिसणार दुर्मिळ ब्लू मून; भारतात कधी पाहता येणार?

31 मे रोजी आकाशात दिसणार दुर्मिळ ‘ब्लू मून’, पण अनेकांना पडलेला प्रश्न म्हणजे चंद्र खरंच निळा दिसणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आज आकाशात दिसणार दुर्मिळ ब्लू मून; भारतात कधी पाहता येणार?
Image Credit source: Social media
| Updated on: May 31, 2026 | 1:20 PM
Share

Blue Moon : आज 31 मे 2026 रोजी संध्याकाळी आकाशात एक दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. या विशेष पौर्णिमेला ‘ब्लू मून’ असे म्हटले जाते. त्यामुळे अनेक खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, नावात ‘ब्लू’ असले तरी चंद्र प्रत्यक्षात निळा दिसणार नाही हे महत्त्वाचे आहे.

खगोलशास्त्रानुसार, एका कॅलेंडर महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास दुसऱ्या पौर्णिमेला ‘ब्लू मून’ म्हटले जाते. मे 2026 मध्ये 1 मे आणि 31 मे अशा दोन पौर्णिमा आल्यामुळे आजची पौर्णिमा ‘ब्लू मून’ म्हणून ओळखली जात आहे. ही घटना साधारणपणे दोन ते तीन वर्षांतून एकदाच घडते. यावर्षीचा ब्लू मून हा ‘मायक्रोमून’ही आहे. म्हणजेच चंद्र पृथ्वीपासून त्याच्या कक्षेतील सर्वाधिक दूरच्या बिंदूजवळ असल्याने तो नेहमीपेक्षा किंचित लहान आणि कमी तेजस्वी दिसू शकतो.

चंद्र निळा नाही तर लालसर किंवा नारंगी का दिसतो?

अनेकांना वाटते की ब्लू मूनच्या दिवशी चंद्राचा रंग निळा असतो. प्रत्यक्षात तसे नसते. चंद्र क्षितिजाजवळ असताना त्याचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातील जाड थरातून प्रवास करतो. या प्रक्रियेत निळ्या रंगाच्या लहरी अधिक प्रमाणात विखुरल्या जातात तर लाल आणि नारंगी रंगाच्या लहरी आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे चंद्र लालसर, केशरी किंवा सोनेरी रंगाचा दिसतो.

आज अनेकांना चंद्र नेहमीपेक्षा खूप मोठा दिसू शकतो. मात्र, हा प्रत्यक्ष आकारातील बदल नसून ‘मून इल्यूजन’ नावाचा दृष्टीभ्रम आहे. जेव्हा चंद्र झाडे, इमारती किंवा डोंगरांच्या जवळ दिसतो, तेव्हा आपल्या मेंदूला तो अधिक मोठा असल्याचा भास होतो.

भारतात ब्लू मून कधी पाहता येणार?

भारतात सूर्यास्तानंतर सायंकाळी साधारण 6.30 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान दक्षिण-पूर्व दिशेकडे हा ब्लू मून पाहणे अधिक सोयीचे ठरेल. हा नजारा पाहण्यासाठी दुर्बीण किंवा महागडी उपकरणे आवश्यक नाहीत. घराची गच्ची, मोकळे मैदान किंवा प्रकाशप्रदूषण कमी असलेली जागा निवडल्यास चंद्र अधिक स्पष्ट दिसू शकतो.

हिंदू पंचांगानुसार आज पौर्णिमा असून हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा वाढते अशी श्रद्धा आहे. ज्योतिषशास्त्रात पौर्णिमेला मनःशांती, आत्मचिंतन आणि सकारात्मक बदलांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे आजचा दिवस अनेकांसाठी विशेष ठरणार आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…