उत्पन्न एकादशीच्या दिवशी राहुकाळात पूजा करणे टाळा, योग्य वेळ जाणून घ्या
मार्गशीर्ष महिन्यातील उत्पन्न एकादशी देवीच्या जन्मामुळे अधिक खास बनते. या दिवशी भगवान विष्णू, लक्ष्मी देवी आणि एकादशी देवीची विधीपूर्वक पूजा करून उपवास केला जातो. पण उत्पन्न एकादशीच्या दिवशी राहूकाल असल्याने या वेळेत पूजा केल्याने त्यांचा लाभ मिळत नाही. चला तर मग आजच्या लेखात आपण पूजा करण्याची योग्य वेळ कोणती आहे ते जाणून घेऊयात.

मार्गशीर्ष महिना सुरू आहे. या महिन्यात येणाऱ्या उत्पन्न एकादशीला पहिली एकादशी म्हणतात. पौराणिक कथेनुसार उत्पन्न एकादशीच्या दिवशी विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांच्या शरीरातून एका मुलीचा जन्म झाला ज्यांनी मुर राक्षसाचा वध केला. त्यावेळी भगवान विष्णूने तिच्यावर प्रसन्न होऊन त्या मुलीला सांगितले की ती एकादशीला माझ्या शरीरात जन्मली आहे, म्हणून तिचे नाव एकादशी असेल.
देवाने एकादशी देवीला वरदान दिले की तिचीही त्यांच्यासोबत पूजा केली जाईल. मार्गशीर्ष महिन्यात उत्पन्न एकादशी ही या देवीच्या जन्माची खासियत आहे. या दिवशी विहित विधींनुसार भगवान विष्णूंसोबत लक्ष्मी देवी आणि एकादशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी उपवास देखील केला जातो. तर या उत्पन्न एकादशीला पूजा आणि उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात समृद्धी येते. पण यंदा उत्पन्न एकादशीच्या दिवशी राहुकाळ आहे. त्यामुळे या राहूकाळात पूजा करणे अशूभ मानले जाते. तर आजच्या लेखात आपण एकादशीच्या दिवशी राहूकाळ कधी सुरू होतो, तसेच उपवास व्रत नेमकी कोणत्या वेळेत करावे व शूभ मुहूर्त कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.
उत्पन्न एकादशी राहु काळ वेळ
या वर्षी उत्पन्न एकादशी 15 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. या दिवशी राहुकाळ आहे. त्यामुळे राहूकाळात शुभ कार्य केले जात नाही. तसेच या काळात केलेले काम शुभ फळ देत नाही. कॅलेंडरनुसार उत्पन्न एकादशीला सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी राहूकाळ सुरू होईल आणि सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी पर्यंत राहील. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा करणे टाळावे.
उत्पन्न एकादशी शुभ मुहूर्त
उत्पन्न एकादशीच्या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत चालेल . विजय मुहूर्त दुपारी 1 वाजून 53 मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी 2 वाजून 36 मिनिटांपर्यंत चालेल. गोधूलि मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी 5 वाजून 54 मिनिटांपर्यंत चालेल. तर या सर्व मुहूर्तांमध्ये तुम्हाला उत्पन्न एकादशीची पूजा व्रत-उपवास करता येते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
