AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा वेंगा यांनी ‘या’ ५ राशींसाठी केली जादुई भविष्यवाणी, २०२५ मध्ये या लोकांवर होणार पैशांचा वर्षाव

बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जगभरात चर्चेचा विषय असते. त्यांनी केलेल्या भविष्यवाणीचा राजकीय, जागतीक स्तरावर परिणाम पाहायला मिळतो.

बाबा वेंगा यांनी 'या' ५ राशींसाठी केली जादुई भविष्यवाणी, २०२५ मध्ये या लोकांवर होणार पैशांचा वर्षाव
| Edited By: | Updated on: Nov 22, 2024 | 4:10 PM
Share

बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जगभरात चर्चेचा विषय असते. बाबा वेंगा हे डोळ्यांनी पाहू शकत नसले तरी त्या त्यांच्या बद्धिमतेने आणि मनातून असे काही तरी पाहत असतात जे सर्वसामान्यांना शक्य नसते. त्यांनी केलेल्या भविष्यवाणीचा राजकीय, जागतीक स्तरावर परिणाम पाहायला मिळतो. बाबा वेंगा यांनी राष्ट्राचा उदय ते पतन, नव्या महाशक्तींचा उदय, जागतिक कुटनिती अशा महत्वाच्या बदलांबद्दल भविष्यवाणी केली होती. त्यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. बाल्कनचे नास्त्रेदमस म्हणून ओळखले जाणारे बाबा वेंगा यांनी ९/११ चा दहशतवादी हल्ला, राजकुमारी डायना यांचा मृत्यू, चेर्नोबिल आपत्ती आणि ब्रेक्झिट सारख्या काही मोठ्या जागतिक घटनांचे भाकीत केले होते. जे कि खरे ठरलेले आहेत अशातच बाबा वेंगा यांनी २०२५ मध्ये या पाच राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धन लाभ होण्याचे भाकीत केले असून या पाच राशी पुढच्या वर्षी श्रीमंत होणार आहेत, चला तर मग जाणून घेऊयात

मेष रास

बाबा वेंग यांच्या दमदार भविष्यवाणीनुसार २०२५ तुमच्या आयुष्यात मैलाचा फायदा होणार आहे. मेष राशींच्या लोकांना येणारे वर्ष हे विपुलता आणि संपत्तीने भरलेले असणार आहे. त्यात या राशीचे लोकांना हे वर्ष केवळ जगण्यासाठी नाही तर कामाच्या व उद्योगाच्या ठिकाणी चमकण्याचे, यश मिळविण्याचे आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्याचे वर्ष आहे. बाबा वेंगा म्हणाले की, मेष ही ब्रह्मांडीय आशीर्वाद प्राप्त करणारी पहिली राशी असेल जिथे नशीब, आर्थिक संधी त्यांना नवीन उंचीवर घेऊन जातील. येणारे वर्ष हे तुमच्या बाजूने असल्याचं सांगितलेलं आहे.

कुंभ राशी

बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, २०२५ मध्ये कुंभ राशीसाठी येणारे वर्ष एक आशादायक असणार आहे. हे वर्ष तुमच्या कारकीर्दीत मोठी उंची गाठण्याचे शिखर ठरेल. कुंभ राशीवर शनी ग्रहाच्या प्रबळ प्रभावामुळे तुमच्या सभोवताल चांगल्या ऊर्जेचा यशस्वी स्त्रोत निर्माण होणार आहे. शनी तुम्हाला केवळ आव्हानच देत नाही तर तुमच्यावर असलेले निर्बंध काढून टाकून सर्वात धाडसी कामे प्रत्यक्षात आणण्याचे सामर्थ्य बळ वाढवणार आहे. २०२५ मध्ये ग्रह एकत्र येऊन आपली आंतरिक क्षमता सक्रिय करतील.

वृषभ रास

वृषभ राशीला येणाऱ्या नवीन वर्षात आर्थिक समृद्धी प्राप्त होईल. ज्या गोष्टींवर तुम्ही इतकी वर्षे मेहनत घेत आहात, त्याचे फळ अखेर मिळणार आहे. तुमच्या अडकून राहिलेल्या कामाचे काही निकाल तुम्हाला आश्चर्यचकित करतील. कुंभ राशीला हे वर्ष आर्थिक स्थैर्य आणि गुंतवणुकीच्या ठोस संधी प्रदान करेल. २०२५ हे वर्ष तुमच्यासाठी तुमचे व्यावसायिक स्थान मजबूत करण्यासाठी असेल. प्रत्येक मिनिटाच्या प्रयत्नांना यश मिळेल.

कर्क रास

या वर्षी कर्क राशी अनपेक्षित रित्या संधी प्राप्त करण्याच्या प्रवासाला सुरुवात करेल. भूतकाळ आणि वर्तमानातील तुमच्या अथक प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. तुम्हाला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीला आकर्षित करण्यासाठी ग्रह अनुकूल संरेखित होणार आहे. नवीन व्यावसायिक उपक्रमांमुळे सुवर्णसंधी मिळणार आहे.

मिथुन रास

हे वर्ष मिथुन राशीसाठी केवळ बदलणार नाही तर आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात तुम्हाला नवीन उंचीवर नेणाऱ्या सुवर्णसंधीचा लाभ मिळणार आहे. आव्हानांवर मात करण्यासाठी तुमची जलद बुद्धी महत्त्वाची भूमिका बजावेल. बाबा वेंगा सांगतात की, तुम्हाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी ग्रहांची युती होत आहे.त्यामुळे या वर्षी तुम्ही आर्थिक रित्या श्रीमंत होणार आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.