Mauni Amavasya 2025: मौनी आमावस्येला संध्याकाळी ‘हा’ उपाय केल्यास पित्र दोष होईल दूर…
Mauni Amavasya परंपरेनुसार मौनी अमावस्येला पित्रांसाठी दिवे लावण्याची हिंदू धर्मात परंपरा आहे. अशा परिस्थितीत मौनी अमावस्येच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावण्याची पद्धत, योग्य वेळ आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.

हिंदू धर्मात मौनी आमावस्येला अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. मौनीआमावस्येच्या दिवशी तुम्ही दान आणि पूजा करू शकता. धार्मिक परंपरेनुसार, मौनी आमावस्येला घरामध्ये आणि घराच्या मुख्य् द्वारा जवळ दिवा लावला पाहिजे. मौनी आमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी घरामध्ये दिवे लावले जातात. घरामध्ये दिवे लावल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक उर्जा दूर होऊन घरातील वातावरन सकारात्मक करते. घरामध्ये संध्याकाळी दिवे लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते. घरातील पित्रदोष कमी कराण्यासाठी मौन आमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवा लावण्याची पद्धत आहे.
घरावधील वातावरण सकारात्मक करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. परंतु, काही कारणांमुळे किंवा वास्तू दोषामुळे तुमच्या घरामधील वातावरण नकारात्मक होते. घरामध्ये वास्तू दोष असल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात. घरामध्ये पित्र दोष असल्यामुळे देखील घरामध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होते. पित्र दोष असल्यास तुमच्या महत्त्वांच्या कामांमध्ये अनेक अडथळे येतात त्यासोबतच तुमचे काम लांबणीवर जातात.
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला मौनी अमावस्या साजरा केला जातो. यंदा 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्या साजरा केला जाणार आहे. या दिवशी भक्त पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दान करतात. मौनी अमावस्येला तर्पण, पिंडदान, पितरांचे श्राद्ध असे विधी केल्यास तुमच्या घरातील पित्र दोष दूर होण्यास मदत होते. मौनी आमावस्येच्या दिवशी प्रयागराजच्या संगमामध्ये स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यंदा महाकुंभादरम्यान मौनी आमावस्या साजरी केली जाणार आहे. मौनी आमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवे लावल्याल तुम्ही पित्र दोषापासून मुक्त होता. तुमच्या पित्रांसाठी दिवे लावणे धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानले जाते. मौनी आमावस्येच्या दिवशी घरात दिवे लावल्यामुळे तुमच्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि वंशजांना त्यांचा आशीर्वाद मिळातो.
मौनी अमावस्या 2025 मुहूर्त अमावस्या तिथी प्रारंभ: 28 जानेवारी, संध्याकाळी 7:35 अमावस्या तिथी समाप्त: 29 जानेवारी, संध्याकाळी 6:05 सूर्योदय: 7:11 AM सूर्यास्त: 5:58 PM
दिवा लावण्याची पद्धत : मौनी अमावस्येला संध्याकाळी मातीचा दिवा घेऊन तो पाण्याने धुवून वाळवावा. त्यानंतर दिव्यात मोहरी किंवा तिळाचे तेल टाकून वात पेटवा. घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावा, कारण ती पित्रांची दिशा मानली जाते . रात्रभर दिवा तसाच ठेवा. घरामध्ये पित्रांचे चित्र असल्यास त्याजवळही दिवा लावावा. धार्मिक मान्यतेनुसार पित्र अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात. या दिवशी ते त्यांच्या वंशजांकडून अर्पण आणि देणगीची अपेक्षा करतात, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. संध्याकाळी, जेव्हा पूर्वज त्यांच्या जगात पत्र येतात, तेव्हा त्यांचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी दिवे लावले जातात. असे केल्याने पित्र संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)