Best Astro Remedies | ज्योतिषशास्त्रातील काही सोपे आणि प्रभावी उपाय करा, सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल

प्रत्येकाला सुख-समृद्धी, संपत्ती-प्रसिद्धी आणि कामात यश हवे असते, पण ते प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. अनेकवेळा असे घडते की सर्व प्रयत्न करुनही काही उद्दिष्टे साध्य होत नाहीत आणि ती फक्त स्वप्नच बनून राहून जातात. प्राचीन काळापासून लोक कामात यश मिळविण्यासाठी पूजा आणि ज्योतिषशास्त्राचे उपाय करत आले आहेत.

Best Astro Remedies | ज्योतिषशास्त्रातील काही सोपे आणि प्रभावी उपाय करा, सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल
Astro Tips

मुंबई : प्रत्येकाला सुख-समृद्धी, संपत्ती-प्रसिद्धी आणि कामात यश हवे असते, पण ते प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. अनेकवेळा असे घडते की सर्व प्रयत्न करुनही काही उद्दिष्टे साध्य होत नाहीत आणि ती फक्त स्वप्नच बनून राहून जातात. प्राचीन काळापासून लोक कामात यश मिळविण्यासाठी पूजा आणि ज्योतिषशास्त्राचे उपाय करत आले आहेत. जे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने करतात, त्यांना याचे सुखद परिणामही मिळतात. चला जाणून घेऊया ज्योतिष शास्त्राच्या अशाच काही सोप्या आणि प्रभावी उपायांबद्दल, जे केल्यावर जीवनाशी संबंधित सर्व त्रास दूर होतात आणि सुख आणि सौभाग्य प्राप्त होते.

💠 संपत्तीची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद नेमही तुमच्या घरावर राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर रोज गाईच्या दुधापासून बनलेल्या शुद्ध तुपाचा दिवा देवीपुढे लावावा. असे मानले जाते की गाईच्या दुधाच्या तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि आपल्या भक्ताला सुख-संपत्तीचा आशीर्वाद देते.

💠 जर तुम्हाला तुमच्या घरात देवी लक्ष्मी नेहमी निवास करावी आणि ती कधीही नाराज होणार नाही असं वाटत असले तर कधीही थुंकी लावून पैसे मोजू नये. असे केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि धनसंपत्ती कमी होते आणि देवी लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते, अशी मान्यता आहे.

💠 व्यवसायात भरपूर प्रगती व्हावी आणि अपेक्षित नफा मिळावा असे वाटत असेल तर कधीही कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसच्या टेबलावर बसून जेवण करु नये. तसेच, त्यावर झोपू नये.

💠 घराच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणारा झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. अशा स्थितीत त्याचा कधीही अनादर करत त्याला पाय लावू नये किंवा आपटू नये. चुकूनही कुणाला झाडू मारु नये. त्याचबरोबर झाडू नेहमी घरामध्ये अशा ठिकाणी लपवून ठेवावा जिथे तो कोणाला दिसणार नाही. परंतु याचीही काळजी घ्या की झाडूने कधीही पूजास्थान किंवा संपत्तीच्या स्थानाला स्पर्श होणार नाही.

💠 जर तुम्ही कोणत्याही विशिष्ट कामासाठी यशाच्या आशेने घर सोडत असाल, तर श्रीरामचरितमानसची ‘प्रबिसि नगर कीजै सब काजा. हृदय राखि कोशलपुर राजा’ ही चौपाई म्हणत घराबाहेर पडा. त्याचबरोबर देवाच्या पूजेत अर्पण केलेले फूल आशीर्वादासह सोबत घेऊन बाहेर पडा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Dev Uthani Ekadashi 2021 : काार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीचे महत्त्व

Shivlinga | शंकराच्या या चमत्कारी स्तोत्राचे पठण करा, प्रत्येक संकट दूर होईल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI