Bhai Dooj 2023 : भाऊबीजेच्या दिवशी अशा प्रकारे सजवा औक्षणाची थाळी, या चुका अवश्य टाळा

या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन औक्षण करूण घेतो, त्याला दीर्घायुष्य लाभते आणि त्याच्या जीवनात आनंद येतो, अशी धार्मिक मान्यता आहे. हिंदू धर्मातील कोणत्याही सणात पूजेच्या थाळीला विशेष महत्त्व असते. पूजेच्या थाळीत ठेवलेल्या वस्तूंनीच आपली पूजा पूर्ण होते.

Bhai Dooj 2023 : भाऊबीजेच्या दिवशी अशा प्रकारे सजवा औक्षणाची थाळी, या चुका अवश्य टाळा
भाऊबीजImage Credit source: Social media
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 9:06 AM

मुंबई : भाऊ आणि बहिणीचा विशेष सण म्हणजेच भाऊबीज (Bhaubeej) 15 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी यमराजाची प्रार्थना करते. या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन औक्षण करूण घेतो, त्याला दीर्घायुष्य लाभते आणि त्याच्या जीवनात आनंद येतो, अशी धार्मिक मान्यता आहे. हिंदू धर्मातील कोणत्याही सणात पूजेच्या थाळीला विशेष महत्त्व असते. पूजेच्या थाळीत ठेवलेल्या वस्तूंनीच आपली पूजा पूर्ण होते. पूजा थाळीत ठेवलेल्या गोष्टींची काळजी घेतली नाही तर आपली पूजा अपूर्ण राहू शकते. शास्त्रानुसार अशा काही गोष्टी या थाळीत ठेवल्या पाहिजेत, ज्या ठेवल्याने आपल्याला शुभ फळ मिळतात. या दिवसाचे महत्त्व काय आहे आणि भाऊबीजेला औक्षवणाच्या थाळीमध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवाव्यात हे जाणून घेऊया.

औक्षणाच्या थाळीत या गोष्टी ठेवा

औक्षणाच्या थाळीमध्ये नारळ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नारळानंतर ताटात चांदीचे नाणे, सोन्याची अंगठी, फुले, अक्षत आणि सुपारी ठेवा.

भाऊबीजसाठी पूजा थाळी कशी तयार करावी

सर्व प्रथम, एक नवीन ताट घ्या आणि गंगाजलाने शुद्ध करा. यानंतर, ताटात एखादे फूल ठेवा. ताट फक्त झेंडूच्या फुलांनी सजवण्याचा प्रयत्न करा. यानंतर पूजेचे सर्व साहित्य –  कुंकू, अक्षत, मौली धागा, सुके खोबरे, मिठाई इत्यादी ताटात ठेवा. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भावाला ओवाळा. भावाला ओवाळल्यानंतर त्याच्या कपाळावर टिळा लावून तोंड गोड करा. तोंड गोड केल्यानंतर भावाला नारळ भेट म्हणून द्या.

हे सुद्धा वाचा

भाऊबीजेच्या दिवशी या गोष्टींची काळजी घ्या

भावाला औक्षण करताना त्याच्या डोक्यावर टोपी किंवा रूमाल असणे आवश्यक आहे.

ओवाळताना भावाचे तोंड दक्षीणेकडे नसावे.

राहूकाळात भावाला ओवाळू नये.

ओवाळल्यानंतर भावाने बहिणीला ओवाळणी द्यावी.

बहिण मोठी असल्यास भावाने तीच्या पाया पडावे.

बहिणीने भावाला कपडे भेट देणे शुभ मानल्या जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?.
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?.
111 एकरवर भव्यसभा, मैदान मराठ्यांनी हाऊसफुल्ल, जिथं नजर तिथं भगवं वादळ
111 एकरवर भव्यसभा, मैदान मराठ्यांनी हाऊसफुल्ल, जिथं नजर तिथं भगवं वादळ.
हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ.
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप.
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले...
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले....
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.