AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊबिजेला भावाला ओवाळल्यानंतर या वस्तू भावाला नक्की द्याव्या; नात्यात गोडवा कायम राहतो

भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण आहे. पण या दिवशी ओवाळताना भावाने कोणत्या दिशेला बसावे आणि बहिणीने भावाला कोणत्या वस्तू द्याव्यात हे वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाचे आहे. योग्य दिशा (उत्तर/पूर्व) व शुभ वस्तू दिल्यास भावाला दीर्घायुष्य, समृद्धी लाभते आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतात.

भाऊबिजेला भावाला ओवाळल्यानंतर या वस्तू भावाला नक्की द्याव्या; नात्यात गोडवा कायम राहतो
Bhaubeej, a brother and sister should definitely give some things to each other;Image Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Oct 20, 2025 | 6:52 PM
Share

भाऊबीज हा सण प्रत्येक भावा-बहिणीसाठी खूप खास असतो. दिवाळीत येणारा हा खास दिवस सर्वच बहीण- भाऊ आनंदाने साजरा करातात. भावांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी, प्रगतीसाठी तसेच त्याच्या समृद्धीसाठी बहीण प्रार्थना करते. भावाला ओवाळाताना बहिण तिच्या भावाला टिळा लावते, अक्षता लावून त्याच्यासाठी प्रार्थना करते. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्रानुसार, ओवाळताना भावाने कोणत्या दिशेने बसणे खूप शुभ मानले जाते? कारण ओवाळताना भाऊ कोणत्या दिशेने बसतो याचा थेट त्याच्या जीवनावर आणि नातेसंबंधांवर परिणाम होतो. तर, जाणून घेऊयाता की भाऊबिजेच्या दिवशी भावाने कोणत्या दिशेला बसावे तसचं बहिणीने भावाला कोणत्या वस्तू दिल्या पाहिजेत.

ओवाळताना भावाने कोणत्या दिशेला बसावे?

वास्तुशास्त्रानुसार, भावाला ओवाळताना किंवा टिळा लावताना त्याने नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे.

उत्तर दिशा ही संपत्ती आणि संधींची दिशा मानली जाते. या दिशेला टिळक लावल्याने तुमच्या भावाच्या करिअरमध्ये आणि आर्थिक जीवनात स्थिरता येते.

पूर्व दिशा ही ज्ञान, बुद्धी आणि सकारात्मक उर्जेची दिशा मानली जाते. या दिशेला तोंड करून टिळा लावल्याने नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि प्रेम वाढते.

बहिणीने भावाला ओवाळताना कोणत्या दिशेला बसावे?

जेव्हा भाऊ उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसतो तेव्हा बहिणीने दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसावे. यामुळे ऊर्जा संतुलन राखली जाते.

टिळा लावताना काय बोलावे?

टिळा लावताना चांगले विचार आणि आशीर्वाद मनात ठेवणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी आणि आनंद तसेच शांतीसाठी प्रार्थना करा. तुम्ही मानसिकरित्या “सौभाग्यवती भव” किंवा “आयुष्यमान भव” सारखे आशीर्वादाचे शब्द म्हणू शकता.

ओवाळताना भावाला कोणत्या वस्तू देणे शुभ मानले जाते?

भावाला भाऊबिजेला ओवाळताना त्याला काही वस्तू देणे शुभ मानले जाते . जसं की सुपारी  किंवा नारळ द्यावा. वास्तुनुसार, या सर्व वस्तू सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहेत. तसेच या वस्तूंद्वारे त्यालाही सकारात्मक ऊर्जा मिळते.

रंगाचा करदोडा: भाऊबिजेला भावाला काळ्या रंगाचा करदोडाही आवर्जून दिला जातो. जेणे करून त्याचे वाईट शक्तींपासून रक्षण व्हावे

कोणत्या दिशेने बसणे टाळावे

वास्तुनुसार, भावाला ओवाळताना भावाने नैऋत्य किंवा पश्चिम-दक्षिण तोंड करून बसणे टाळावे. या दिशा जडपणा आणि अडथळे दर्शवतात. या दिशांना तोंड करून ओवाळल्याने दुःख किंवा संघर्ष होण्याची शक्यता वाढते.

वास्तुशास्त्रानुसार भाऊबिजेला दिशा आणि ऊर्जा तसेच त्याला दिलेल्या वस्तू या भावाच्या आयुष्यावर नक्कीच परिणाम करातात. त्यामुळे ते देताना खूप साऱ्या आशीर्वादासह, शुभेच्छांसह आणि सकारात्मकतेसह द्यावे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...