Bhutadi Amavashya : या तारखेला आहे भुतडी अमावस्या, काय आहे या अमावस्येचे महत्त्व?

या दिवशी स्नान, दान यासारखे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य केले जातात. चैत्र अमावस्या पितृ तर्पण सारख्या विधींसाठी देखील ओळखली जाते. लोकं कावळे, गायी, कुत्रे आणि गरीब लोकांनाही खाऊ घालतात.

Bhutadi Amavashya : या तारखेला आहे भुतडी अमावस्या, काय आहे या अमावस्येचे महत्त्व?
चैत्र अमावस्याImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 12:09 PM

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात. संपूर्ण वर्षात 12 अमावस्या असतात आणि प्रत्येक अमावस्येला स्वतःचे महत्त्व असते. चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya) हा हिंदू वर्षाचा शेवटचा दिवस आहे. चैत्र अमावस्या हा दिवस आपल्या धर्मात अत्यंत शुभ मानला जातो. ही अमावस्या मार्च-एप्रिल महिन्यात येते. मात्र, आपल्या भारतीय संस्कृतीत या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान यासारखे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य केले जातात. चैत्र अमावस्या पितृ तर्पण सारख्या विधींसाठी देखील ओळखली जाते. लोकं कावळे, गायी, कुत्रे आणि गरीब लोकांनाही खाऊ घालतात. गरुड पुराणानुसार, अमावस्येला पूर्वज आपल्या वंशजांना भेट देतात आणि त्यांना भोजन देतात.

चैत्र अमावस्या व्रत हा हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय व्रतांपैकी एक आहे. अमावस्या व्रत किंवा उपवास सकाळी सुरू होतो आणि प्रतिपदेला चंद्रदर्शन होईपर्यंत चालू असतो. याला भूतडी अमावस्या (Bhutadi Amavasya) असेही म्हणतात. या तिथीचे महत्त्व खूप मोठे मानले जाते. भूतडी अमावस्येची नेमकी तिथी आणि तिचे महत्त्व जाणून घेऊया.

भूतडी मावस्येची तारीख

चैत्र महिन्याची अमावस्या सुरू होते: 20 मार्च, रात्री 01:47 पासून चैत्र महिन्याची अमावस्या समाप्ती: 21 मार्च रात्री 10:53 वाजता. उदयतिथीनुसार चैत्र अमावस्या 21 मार्च रोजी साजरी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

चैत्र अमावस्याला भूतडी अमावस्या का म्हणतात?

तुमच्या मनात प्रश्न असेल की अमावस्या दर महिन्याला येते, पण फक्त चैत्र अमावस्यालाच भूतडी अमावस्या का म्हणतात? या मागचे कारण आम्ही तुम्हाला सांगतो. वास्तविक, भूत म्हणजे नकारात्मक शक्ती, काही अतृप्त आत्मा त्यांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी जिवंत लोकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात आणि उग्र रूप धारण करतात. या उग्रतेला शांत करण्यासाठी, नकारात्मक उर्जेने प्रभावित लोक भूतरी अमावस्येला पवित्र नदीत स्नान करतात.

या तारखेचे महत्त्व काय आहे?

कोणतीही अमावस्या असो, या दिवशी पितरांचे श्राद्ध विधी केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. चैत्र अमावस्येलाही पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष उपाय करावेत. असे मानले जाते की चैत्र अमावस्येला भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील दुःख, संकट आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. पुराणात असे सांगितले आहे की या शुभ दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने तुमची पापे आणि वाईट कर्म धुऊन जातात.अमावस्या तिथीला भक्त पितरांचे श्राद्ध वगैरे करतात, असे केल्याने पितृदोष समाप्त होतो.

भूतडी अमावस्येला करा हे उपाय

  • भूतडी अमावस्येला हे उपाय केल्याने पितरांची कृपा आपल्यावर कायम राहते.
  • घरामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी करावे.
  • गाईला हिरवा चारा द्यावा.
  • कुत्र्यांना आणि कावळ्यांना भाकरी खायला द्या.
  • शक्य असल्यास अन्नधान्य, कपडे इत्यादी गरजूंना दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.