AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रावण सुरू होण्यापूर्वी या तीन वस्तू घरात आणाच; सदैव राहील महादेवांची कृपा

हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात जर तुम्ही भक्ती भावाने महादेव आणि पार्वती मातेची पूजा केली तर तुमचे सर्व कष्ट आणि संकटं दूर होतात.

श्रावण सुरू होण्यापूर्वी या तीन वस्तू घरात आणाच; सदैव राहील महादेवांची कृपा
| Updated on: Jun 29, 2025 | 9:41 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात जर तुम्ही भक्ती भावाने महादेव आणि पार्वती मातेची पूजा केली तर तुमचे सर्व कष्ट आणि संकटं दूर होतात. तुमची तुमच्या कुटुंबाची भरभराट आणि प्रगती होते. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारला देखील खूप महत्त्व आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उपवास करून महादेवाच्या मंदिरात जाऊन विधीवत पूजा केल्यानं पुण्य लाभतं.

आता काही दिवसांमध्येच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. अशा काही वस्तू आहेत, ज्या श्रावण महिन्यापूर्वी घरी आणणे शुभ मानलं जातं. ज्यामुळे तुमच्यावर सदैव महादेवांची कृपा राहाते. महादेवांच्या आशीर्वादामुळे घराची भरभराट होते. घरात सुख शांती राहाते. त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

रुद्राक्ष – असं मानलं जात की रुद्राक्ष हा महादेवांच्या अश्रू पासून बनला आहे. रुद्राक्ष हा महादेवांना अतिशय प्रिय आहे. श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी रुद्राक्ष घरी जरुर आणावा, गळ्यात किंवा हातामध्ये रुद्राक्षाची माळ घालून महादेवाची पूजा करावी. यामुळे पूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळतं, असं मानलं जातं, रुद्राक्षाचा तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो, तसेच त्यामुळे तुमचं मन शांत राहातं.

नंदीची प्रतिमा – असं मानलं जातं की महादेवांना आपले गण खूप प्रिय आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार महादेवांची पूजा करण्यापूर्वी त्यांच्या गणांची पूजा केली पाहिजे, त्यानंतर महादेवांची पूजा करावी, अशा पद्धतीनं पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात. त्यामुळे महादेवासोबतच त्यांचे गन देखील घरी असावेत यामुळे महादेवांची सदैव कृपा राहाते.

भस्म – असं म्हणतात की भस्माशिवाय महादेवांची पूजा अपूर्ण आहे, त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीच घरी भस्म आणून ठेवा, जर घरात भस्म असेल तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.