Career Horoscope : इंजिनिअर, डॉक्टर व्हायचंय, मग कुंडलीत हा का योग? जाणून घ्या काय सांगतात ग्रह
Career Horoscope : डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक जण त्यासाठी जीवतोड मेहनत करतात. कष्टाने अनेकांना त्यांचे स्वप्न साकारता येते. पण अनेकांना ते कोणत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतील, याची उत्सुकता असते. डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी कोणत्या ग्रहाची कुंडलीत लागते बैठक?

डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मेहनतीशिवाय कोणत्याच क्षेत्रात प्रवेश करता येत नाही तर चमकता सुद्धा येत नाही. कष्टाने अनेकांना त्यांचे स्वप्न साकारता येते. पण अनेकांना ते कोणत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतील, याची उत्सुकता असते. त्यासाठी काही जण ज्योतिषाकडे जातात. कुंडली दाखवतात. जर एखादी व्यक्तीला अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात भरारी घ्यायची असेल तर काही जण ग्रहमानाची पण चाचपणी करतात. पण तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी कोणत्या ग्रहाची कुंडलीत लागते बैठक?
डॉक्टर होण्यासाठी कुंडलीत आहेत का हे ग्रह?
वैद्यकीय शिक्षणासाठी कुंडलीत सर्व ग्रहाची गर्दी असण्याची गरज नाही. सूर्य आणि शनि कुंडलीत योग्य स्थानावर असावा. त्याचवेळी राहू आणि मंगळाचा त्यावर प्रभाव असावा. ज्योतिषशास्त्रानुसार, जन्मपत्रिकेत 18 वा आणि 12 व्या घरात हे ग्रह असतील तर डॉक्टर होण्याचा योग जुळून येतो. मंगळाची स्थिती भक्कम असेल तर तुम्ही डॉक्टर होऊ शकतो.
इंजिनिअर होण्यासाठी या ग्रहांची हवी बैठक
ज्योतिषशास्त्रानुसार, पुत्रिकेत सूर्य, मंगळ आणि बुध एकाच राशीत बलस्थानी असावे, तर इंजिनिअरिंग आणि तांत्रिक ज्ञान मिळणे सोपे जाते. मंगळ आणि राहूचा संयोग व्यक्तीला इंजिनिअर करण्यासाठी प्रेरणा देतो. सूर्य-बुधाचा बुधादित्य योग पंचमेश आणि दशमात असेल तर अभियंता होण्याचा दाट योग असतो.
राशीनुसार करिअरचे क्षेत्र
मेष (Aries) : सैन्य, पोलीस, क्रीडा, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, अग्निशमन
वृषभ (Taurus) : आर्किटेक्चर, फॅशन डिझाईन, गायन, बँकिंग, शेती, फाइन आर्ट्स
मिथुन (Gemini) : पत्रकारिता, लेखन, मार्केटिंग, मीडिया, भाषाशास्त्र, शिक्षण
कर्क (Cancer) : मानसशास्त्र, सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्र (नर्सिंग), बालविकास
सिंह (Leo) : अभिनय, राजकारण, व्यवस्थापन, उद्योजकता, PR
कन्या (Virgo) : वैद्यकीय क्षेत्र, फार्मसी, लेखा, रिसर्च, संगणक शास्त्र
तुळ (Libra) : कायदा, फॅशन, इंटिरिअर डिझाईन, मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र
वृश्चिक (Scorpio) : गुप्तचर सेवा, मानसशास्त्र, रिसर्च, औषधनिर्माण, फॉरेन्सिक सायन्स
धनु (Sagittarius) : धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, परदेशी भाषा, पर्यटन, अध्यापन
मकर (Capricorn) : प्रशासन, अभियांत्रिकी, बांधकाम, वित्त, अकाऊंटिंग
कुंभ (Aquarius) : आयटी, विज्ञान, संशोधन, सोशल सायन्स, नवोन्मेष (innovation)
मीन (Pisces) : संगीत, काव्य, चित्रकला, आध्यात्मिक शिक्षण, मानसोपचार
डिस्क्लेमर : ही सर्वसाधारण माहिती आहे. ती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारीत आहे. टीव्ही ९ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. त्याचे समर्थन करत नाही
