Chaitra Navratri 2021 | आज चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस, देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी…

नवरात्रीचा नऊ दिवसांचा शुभ उत्सव मंगळवारी म्हणजेच 13 एप्रिलपासून सुरु (Chaitra Navratri 2021) झाला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी देवी शैलपुत्रीची पूजा केली आणि देवी दुर्गाच्या एक रुपाची पूजा-अर्चना केली.

Chaitra Navratri 2021 | आज चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस, देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी...
Maa-Bhramchahrini

मुंबई : नवरात्रीचा नऊ दिवसांचा शुभ उत्सव मंगळवारी म्हणजेच 13 एप्रिलपासून सुरु (Chaitra Navratri 2021) झाला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी देवी शैलपुत्रीची पूजा केली आणि देवी दुर्गाच्या एक रुपाची पूजा-अर्चना केली. नवरात्रीच्या उत्सवात भक्त मंत्रांचा जप करतात आणि ते देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा करतात. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. यांना ज्ञानाचे प्रतीक मानलं जातं (Chaitra Navratri 2021 day 2 How To Worship Devi Brahmacharini).

चित्रात्मक वर्णनानुसार, देवी ब्रह्मचारिणी हातात जपमाला धारण करतात आणि त्या पांढऱ्या रंगाच्या साडीपरिधान करतात. या दिवशी भाविकांनी देवी ब्रह्मचारिणीच्या मूर्तीवर चमेलीचं फूल अर्पण करावं, कारण हे देवी ब्रह्मचारिणीचं आवडतं फूल आहे.

देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी?

1. भाविकांनी सकाळी लवकर उठून स्नान करावं.

2. त्यानंतर भाविकांनी फूल, रोली, चंदन आणि इतर पूजा सामुग्री घ्यावी आणि देवी ब्रह्मचारिणीच्या मूर्तीला अर्पण करावं.

3. त्यानंतर देवीच्या मंत्रांचा जप करावा आणि आरती करावी.

कुठल्या मंत्राचा जप करावा –

या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारी रूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||
दधाना कर पद्मभ्यम् अक्षमाला कमंडलु |
देवी प्रसीदतु मां ब्रह्मचारिण्यनुत्तमा ||

ओम देवी शैलपुत्रायै नमः

या देवी सर्व भूतेषु शक्ति रूपेण संस्थिता ||
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||

आरती :

जय अम्बे गौरी, मैया जय श्यामा गौरी
तुमको निशदिन ध्यावत, हरि ब्रम्हा शिवरी
ओम जय अम्बे गौरी
मांग सिंदूर विराजत, टिको मृगमद को
उज्जवल से दो नैना, चंद्रवदन निको
ओम जय अम्बे गौरी
कनक समान कलेवर, रक्ताम्बर राजे
रक्तपुष्प गल माला, कंठन पर साजे
ओम जय अम्बे गौरी
केहरी वाहन रजत, खड़ग खप्पर धारी
सुर-नर-मुनिजन सेवत, तिनके दुखाहारी
ओम जय अम्बे गौरी
कानन कुंडल शोभित, नासाग्रे मोती
कोटिक चंद्र दिवाकर, रजत सम ज्योति
ओम जय अम्बे गौरी
शुम्भ-निशुम्भ बिदारे, महिषासुर घाती
धूम्रविलोचन नैना, निशिदिन मदमाती
ओम जय अम्बे गौरी
चंड-मुंड सन्हारे, शोणित बीज हरे
मधु-कैटभ दोऊ मारे, सुर भय दूर करे
ओम जय अम्बे गौरी
ब्राह्मणी, रुद्राणी, तुम कमला रानी
अगम निगम बखानी, तुम शिव पटरानी
ओम जय अम्बे गौरी।
चौसठ योगिनी गावत, नित्य करत भैरों
बाजत ताल मृदंगा, अरु बाजत डमरू
ओम जय अम्बे गौरी
तुम ही जग की माता, तुम ही हो भर्ता
भक्तन के दुःख हर्ता, सुख सम्पति कर्ता
ओम जय अम्बे गौरी
भुजा चार अति शोभित, वरमुद्रा धारी
मनवांछित फल पावत, सेवत नर नारी
ओम जय अम्बे गौरी
कंचन थाल विराजत, अगर कपूर बाती
श्रीमालकेतु में राजत, कोटि रतन ज्योति
ओम जय अम्बे गौरी
श्री अम्बेजी की आरती, जो कोई नर गावे
कहत शिवानंद स्वमी, सुख-संपत्ति पावे
ओम जय अम्बे गौरी

त्याशिवाय भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करुन खीर, मिठाई आणि अनेक फळ अर्पण करावे.

Chaitra Navratri 2021 day 2 How To Worship Devi Brahmacharini

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chaitra Navratri 2021 | 13 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात, त्यापूर्वी ही कामं आटपून घ्या, देवी प्रसन्न होईल…

Chaitra Navratri 2021 | नवरात्रीदरम्यान चुकूनही ‘या’ गोष्टी करु नये, अन्यथा नुकसान होऊ शकतं…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI