
चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या माणसानं नेहमी एकांतात कराव्यात, ज्यामुळे तुमचा फायदा होतो, तसेच तुम्हाला लवकर यशाची प्राप्ती होते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.
अभ्यास – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अभ्यासाला खूप महत्त्व असतं. तुम्ही काय शिकला आहात? तुमचं शिक्षण किती झालं आहे, यावरच तुमचं पुढचं भविष्य अवलंबून असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा अभ्यास करत असता किंवा विद्या प्राप्त करत असतात. तेव्हा ती एकांतातच करावी, जर तुम्ही गोंगाट असलेल्या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न कराल तर तुमचं मन अभ्यासात लागणार नाही, तुमचं लक्ष विचलित होईल, लक्ष विचलित झाल्यास तुम्ही काय अभ्यास केला आहे, हे तुमच्या लक्षात राहणार नाही, तुमचा अभ्यास अपूर्ण राहील म्हणून नेहमी अभ्यास करताना तो एकांतातच करावा.
साधना – साधना किंवा तप तुम्ही जेव्हा ईश्वराची भक्ती करत असता किंवा नामस्मरण करत असाल तर अशा गोष्टी या भौतिक जगापासून दूर जाऊनच कराव्या, तरच त्याचं इच्छित फळ तुम्हाला प्राप्त होतं, म्हणून साधना ही नेहमी एकांतात करावी असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
पैशांशी संबंधित कामं – आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही जर पैशांचा एखादा व्यवहार करणार असाल किंवा पैशांशी संबंधित इतर कोणतंही काम असेल तर ते एकांतात करा, पैशांचे व्यवहार असे करा ज्याची माहिती तुमच्या कितीही जवळचा व्यक्ती असेल त्याला देखील माहिती होता कामा नये, कारण तुमच्याकडे किती पैसा आहे, संपत्ती आहे, याची माहिती लोकांना कळाली तर तुम्हाला नवीन शत्रू निर्माण होतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
जेवण – चाणक्य म्हणतात जेवण देखील एकंतात आणि शांतचित्तानेच करावं, तुम्ही जेव्हा जेवण करत असता तेव्हा तुमच्या डोक्यात इतर कोणतेही विचार ठेवू नका, कारण तुमच्या मनात जे विचार असतात तसाच प्रभाव हा तुमच्या आहारावर देखील पडतो.