AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात श्रीमंत व्हायचंय? मग या तीन सवयी आजच सोडा

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात, चाणक्य यांनी अशा तीन सवयी सांगितल्या आहेत, ज्या सवयीचा प्रत्येकानं त्याग केला पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात श्रीमंत व्हायचंय? मग या तीन सवयी आजच सोडा
| Updated on: Jun 02, 2025 | 1:43 AM
Share

आर्य चाणक्य हे महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य यांचे विचार अनेकांना प्रेरणा देतात. थोडक्यात आयुष्य जगत असताना काय करावं? आणि काय करू नये? याचं सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये आदर्श राजा कसा असावा, राजाची कर्तव्य काय आहेत? प्रजेची कर्तव्य काय आहेत. आदर्श पत्नी कोणाला म्हणावं? आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे कसं ओळखावं? अशा एकना अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.

दरम्यान आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये श्रीमंत होण्याचे काही मार्ग सांगितले आहेत. आपल्या कोणत्या चुका आपल्या श्रीमंतीच्या मार्गातील अडथळा ठरतात? त्या कशा दूर केल्या पाहिजे यावर देखील चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये चर्चा केली आहे. चाणक्य म्हणतात अशा काही सवयी असतात, ज्या माणसाला कधीच श्रीमंत होऊ देत नाहीत, त्या सवयी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्द आज आपण जाणून घेणार आहोत.

बोलण्यावर नियंत्रण ठेवा – आर्य चाणक्य म्हणतात तुमचं बोलणं कसं आहे? यावरूनच तुम्हाला कामात यश मिळणार का? हे ठरत असतं. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. तुमचा स्वभाव जर रागीट असेल तर आजच राग सोडून द्या कारण शांततेच्या मार्गानं केलेलं कोणतंही काम हे नेहमी यशस्वी ठरतं.

आळस – आर्य चाणक्य म्हणतात आळस हा मणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, तुम्ही जर कामांमध्ये चाल ढकल करत असाल तर त्यामुळे त्यापासून तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे कोणतंही काम वेळत पूर्ण करा.

पैशांची बचत –  चाणक्य म्हणतात अनेक लोकांना पैशांची उधळपट्टी करायची सवय असते, मात्र या सवयीचा त्याग केला पाहिजे, पैशांची बचत केली पाहिजे. कारण संकट काळात हीच बचत आपल्या कामी येणार असते.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.