AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात आयुष्यात काहीही करा, पण या 4 चुका कधीच करू नका, मोजावी लागेल मोठी किंमत

आर्य चाणक्य हे त्या काळातील एक महान विद्वान होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी ज्या गोष्टी सांगीतल्या आहेत, त्या आजही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात अशा काही चुका असतात, त्या चुका माणसानं कधीही करू नयेत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात आयुष्यात काहीही करा, पण या 4 चुका कधीच करू नका, मोजावी लागेल मोठी किंमत
चाणक्य Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2025 | 9:16 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगीतल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मानवाला आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक ठरतात. त्याला जीवन जगण्याची प्रेरणा देतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात, अशा काही चुका असतात, ज्या कधीच माफ केल्या जाऊ शकत नाहीत, तुम्ही जर या चुका कराल तर तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची दुसरी संधी कधीच भेटत नाही, यामुळे तुमचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. तुमचं आयुष्य बरबाद होऊ शकतं, त्यामुळे मानवाने कधीही या चुका करू नयेत. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

वेळेला हलक्यात घेणे – चाणक्य म्हणतात वेळ कोणासाठीही कधीही थांबून राहत नाही, तसेच एकदा वेळ निघून गेली की ती पुन्हा कधीही परत येत नाही, त्यामुळे माणसाने आपलं प्रत्येक काम हे वेळेतच करायला हवं. अभ्यास हा विद्यार्थी दशेतच व्हायला हवा, तुम्ही जर विद्यार्थी दशेत चांगला अभ्यास केला तर भविष्यात तुम्हाला चांगला रोजगार मिळू शकतो, तुम्ही तुमचं उर्वरीत आयुष्य आनंदात जगू शकता, मात्र ही जर वेळ निघून गेली तर मग मात्र तुमच्या हातात पश्चातापाशिवाय दुसरं काहीही राहणार नाही.

चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवणं – चाणक्य म्हणतात आयुष्यात कधीही चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवू नये, हे लोक कधी दगा देतील याचा भरोसा नसतो, त्यांच्यामुळे भविष्यात तुम्हाला फार मोठं नुकसान होऊ शकतं.

भावनिक होऊ एखादा निर्णय घेणं – चाणक्य म्हणतात कधीही भावनिक होऊन कोणताही निर्णय घेता कामा नये, कारण भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकण्याची शक्यताच जास्त असतं.

आपली चूक लपवणं – चाणक्य म्हणतात तुम्ही तुमची चूक लपवू नका, उलट ती मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करा, पुढे जात रहा, त्यातच तुमचं हित आहे.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.