Chanakya Niti : फक्त या तीन गोष्टी करा, यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आयुष्यात जर यशस्वी व्हायच असेल तर माणसाने काय करावं? याबाबत त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. माणसानं आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात कोणालाही यश असं एका रात्रीमध्ये मिळत नाही, त्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. मेहनत करावी लागते, कधी-कधी तुम्ही प्रचंड कष्ट करतात, परंतु तरी देखील एखाद्यावेळी तुम्हाला अपयश येतं, अशावेळी तुम्ही जर खचून गेलात तर तुमचा पराभव निश्चित आहे. परंतु जर तुम्ही संयम ठेवला तर मात्र तुम्हाला विजयापासून कोणीही थांबवू शकणार नाही, अशा काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं पालन तुम्ही केल्यास यश तुम्हाला नक्की मिळेल, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
संयम – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात संयम हा असायलाच हवा, जर तुमच्या आयुष्यात संयम नसेल तर तुम्हाला यश कधीही मिळू शकत नाही. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सुरू करता, तेव्हा तुम्हाला त्यामध्ये पहिल्यावेळी कदाचित अपयश येऊ शकतं, परंतु तुम्ही जर तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवलं, संयम ठेवला तर एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी होता, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
कष्ट – चाणक्य म्हणतात कधीही कष्टाला लाजू नका, आयुष्यात जर यशस्वी व्हायच असेल तर तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहेत, त्यामुळे जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाहीत, तोपर्यंत कष्ट सुरूच ठेवा, कष्टात सातत्य ठेवा.
विश्वास – चाणक्य म्हणतात तुम्ही तुमच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवताना तो फार काळजीपूर्वक ठेवा, जर तुम्ही योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
