AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda: गोविंदाने उचलले मोठे पाऊल, थेट लीगल नोटिस… नेमकं काय झालं?

Govinda: बॉलिवूड अभिनेचा गोविंदाने नुकताच एक मोठे पाऊल उचलले आहे. त्याने एक लीगल नोटीस काढली आहे. या नोटीसमध्ये नेमकं काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

Govinda: गोविंदाने उचलले मोठे पाऊल, थेट लीगल नोटिस... नेमकं काय झालं?
Sunita AhujaImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 23, 2026 | 2:27 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा हे चांगलेच चर्चेत आहेत. त्या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच सुनीता कोर्टाबाहेर दिसली होती. त्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांनी आणखी जोर धरला. दरम्यान, गोविंदाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

गोविंदाने त्यांच्याबद्दल भ्रामक आणि खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. अभिनेत्याने लीगल नोटिस काढून १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करण्याची चेतावनी दिली आहे.

गोविंदाने स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाबद्दल खोटी किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची धमकी दिली आहे. अभिनेत्याने मीडिया संस्था, सोशल मीडिया अकाउंट्स आणि कंटेंट क्रिएटर्सना सार्वजनिक नोटिस जारी केला आहे. त्यात स्पष्ट म्हटले आहे की, त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाशी संबंधित कोणतीही खोटी, मानहानिकारक किंवा ठोस पुरावे नसलेली कोणतीही माहिती शेअर किंवा प्रकाशित करू नये.

गोविंदाने जारी केला लीगल नोटिस

गोविंदाने विशेषतः एआय (AI) च्या मदतीने तयार केलेल्या फेक कंटेंटबाबतही सूचना दिली आहे. त्यात त्याचे मॉर्फ केलेले छायाचित्रे, खोटे व्हिडिओ, ऑडिओ, डीपफेक आणि एआयने बदललेली छायाचित्रे यांचा समावेश आहे. अभिनेत्याचे म्हणणे आहे की, त्यांनी कोणालाही डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे नाव, छायाचित्र, आवाज किंवा कुटुंबाशी संबंधित खाजगी गोष्टींचा चुकीचा वापर करण्याची परवानगी दिलेली नाही.

गोविंदाने काढलेल्या लीगल नोटिसमध्ये म्हटले आहे की, जर कोणी असे कंटेंट तयार करतो, पोस्ट करतो किंवा पुढे शेअर करतो, तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्यात मानहानी, गोपनीयतेचा भंग, ओळखीचा चुकीचा वापर आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे असू शकतात. नोटिसमध्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या तरतुदींचाही उल्लेख करण्यात आला आहे.

१०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल

गोविंदाने आपल्या या नोटिसमध्ये म्हटले आहे की, अशा फेक बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध ते १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करतील. सांगायचे तर, गेल्या बराच काळ गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहूजा सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी भांडत आहेत. सुनीता आहूजाने पॅपराझींसमोर आपल्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तर गोविंदानेही सर्वांसमोर प्रत्युत्तर दिले आहे.

Follow Us
घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच... खवड्या डोंगरावरील प्रकरण दिसतंय इतकं सरळ
घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच... खवड्या डोंगरावरील प्रकरण दिसतंय इतकं सरळ नाही, कुणालच्या आत्यानं जे सांगितलं ते...
धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना... खवड्या डोंगरावरील
धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना... खवड्या डोंगरावरील दुर्घटना प्रकरण वेगळ्याच वळणावर?
सीसीटीव्हीत... रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; PAच्या 12 वर्षीय...
सीसीटीव्हीत... रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; PAच्या 12 वर्षीय लेकीचा मृत्यू नेमका कशामुळे?
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं...
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं टायअप, यंदाचा गणेशोत्सव...
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद,
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद, प्रमुख तीन मागण्या काय?
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्ट्रभरात... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला मोठा धक्का, धाराशिव...
शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला दिला आणखी मोठा धक्का, धाराशिवच्या राजकारणात...
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर कपरे भरवणारी
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर थरकाप उडवणारी माहिती समोर
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच..
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच... हादरवणारी माहिती समोर
कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनीची चक्रावणारी माहिती
खवड्या डोंगर: कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनी दिली चक्रावणारी माहिती, अखेरच्या चार महिन्यांमध्ये...