AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : मेहनत करूनही अपयशच मिळतंय? मग चाणक्यांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की कधी- कधी आयुष्यात असे प्रसंग येतात, जेव्हा तुम्ही कठोर परिश्रम करतात परंतु तुम्हाला अपेक्षित यश मिळत नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये संयम हा खूप महत्त्वाचा असतो.

Chanakya Niti : मेहनत करूनही अपयशच मिळतंय? मग चाणक्यांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 20, 2026 | 9:14 PM
Share

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये एकूण 25 प्रकरणं असून 6 हजार श्लोक आहेत. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. अनेकदा एखाद्याच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते की तो व्यक्ती एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट करतो. दिवसरात्र एक करतो, परंतु त्याला काही त्यात यश मिळत नाही. अशा स्थितीमध्ये तो व्यक्ती खचून जातो. जेव्हा तुम्हाला प्रचंड कष्ट करूनही वारंवार अपयश येत असेल तर अशा स्थितीमध्ये नेमकं काय करायचं? परिस्थितीचा सामना कसा कारायचा? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्यासोबत अशा गोष्टी घडतात तेव्हा तुम्ही शांत रहा, संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पाहा. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमका काय सल्ला दिला आहे? त्याबद्दल.

धोका पत्करण्याची तयारी – चाणक्य म्हणतात असं एकही क्षेत्र नाही, जिथे धोका नाही. त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्हाला धोका पत्करण्याची तयारी ठेवावीच लागेल. त्यासाठी तुम्हाला आधीच संपूर्ण तयार रहावं लागेल. जर तुमची धोका पत्करण्याची तयारी असेल तर एकदा -दोनदा तुमच्या वाट्याला अपयश येईल, मात्र तिसऱ्यांना तुम्ही अशा जागी पोहोचाल, जिथे इतर कधीही पोहचू शकणार नाहीत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

योजना – चाणक्य म्हणतात कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी त्या कामाची रूपरेषा आखावी लागते. तुमच्या मनात आलं आणि तुम्ही एखादं काम सुरू केलं असं होत नाही. त्यामुळे सर्व प्रकारची जोखीम लक्षात घेऊनच नवी सुरुवात करावी. जर समजा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करणार असाल तर त्यापूर्वी त्याची योजना तयार करा, मात्र जोपर्यंत तुम्हाला त्यात यश मिळत नाही, तोपर्यंत अशा योजना या गुप्तच ठेवा, त्यातच तुमचं हीत आहे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

नवीन शिकण्याची तयारी – चाणक्य म्हणतात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल, परंतु बदल हा सृष्टीचा नियम आहे. सर्वच क्षेत्र हे झपाट्याने बदल असतात. त्यामुळे हे बदल तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत. तुमच्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान तुमच्याजवळ असलं पाहिजे, तर आणि तरच तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?