AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील आरशाची काच अचानक फुटली… अर्थ काय?; चाणक्य काय म्हणतात?

जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगला जीवनसाथी निवडायचा असेल तर चाणक्य यांच्या या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडू शकतात. चाणक्य यांच्या या गोष्टी तुमच्या आयुष्यात आनंद आणू शकतात आणि त्याचबरोबर सर्व संकटांवर मात ही करू शकतात.

घरातील आरशाची काच अचानक फुटली... अर्थ काय?; चाणक्य काय म्हणतात?
Chanakya NitiImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 31, 2024 | 7:16 PM
Share

जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जात असाल किंवा नवीन जीवनसाथी निवडणार असाल तर जाणून घ्या आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी. कारण या गोष्टी तुम्हाला एक चांगला जीवनसाथी निवडण्यास मदत करू शकतात. कारण चाणक्य नीती आपल्याला जीवनाच्या प्रत्येक पैलूवर मार्गदर्शन केले आहे ज्याच्या अवलंब आपण केल्यास आपले जीवन सुरळीत चालते. त्यात विवाह हा जीवनातील एक महत्त्वाचा अध्याय असून चाणक्य यांनी जीवनसाथी निवडण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जोडीदाराचे चारित्र्य सर्वात महत्त्वाचे असते. सदाचारी व्यक्तीच तुमच्यासोबत सुखी जीवन जगू शकतो.

आचार्य चाणक्य म्हणतात की, जोडीदाराने नेहमी प्रामाणिक राहिले पाहिजे. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवता येत नाही. एक दयाळू व्यक्तीच इतरांच्या भावना समजून घेऊ शकते आणि तुमच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकते. आयुष्यात चढ-उतार येतातच. हेच चढउतारांना सहन करणारीच व्यक्ती सामोरे जाऊ शकते.

आचार्य चाणक्य यांची नीती आणि त्यांनी दिलेली शिकवण माणसाने आपल्या जीवनात अंगीकारली तर त्याला यश नक्कीच मिळते. मैत्री, नोकरी किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या असतील तर चाणक्यच्या काही गोष्टींचे पालन केले पाहिजे. यामुळे सर्व संकटे आणि क्लेश दूर होतात. जर तुम्ही स्वत:साठी चांगला जीवनसाथी, प्रत्येक सुख-दु:खात तुमच्या सोबत असणारी पत्नी शोधत असाल तर तिच्यात आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले हे गुण नक्की शोधा.

खूप प्रगती मिळते

आचार्य चाणक्य यांच्यानुसार शांत आणि संयमी स्त्रिया हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा स्त्रिया घराला शांती देतात, असा त्यांचा विश्वास आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीशी ते जोडले जातात, त्या व्यक्तीची आयुष्यात बरीच प्रगती होते. सुशिक्षित आणि सुसंस्कृत स्त्री केवळ घरच नव्हे, तर येणाऱ्या पिढ्यांमध्येही सुधारणा घडवून आणते. अशा महिलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नसते. ते प्रत्येक परिस्थिती सहजपणे हाताळतात, तसेच कोणताही निर्णय घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

घरातील आरश्याची काच अचानक तुटणे

घरातील काच अचानक तुटली किंवा इतर कोणत्याही कारणास्तव काच फुटली तर तेदेखील अशुभ चिन्ह मानले जाते. यावरून आर्थिक अडचणींकडे लक्ष वेधले जाते. ग्लास फुटल्यानंतर ते काढून टाकण्याचा किंवा ताबडतोब बदलण्याचा प्रयत्न करा.

असे मानले जाते की चाणक्यच्या धोरणांचे अनुसरण करून एक सामान्य मुलगा म्हणजेच चंद्रगुप्त मोठा होऊन सम्राट बनला. चाणक्य यांची धोरणे आजच्या काळातही समर्पक मानली जातात. अनेकदा असे घडते की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो तो आपल्याला फसवतो. अशा वेळी चाणक्ययांच्या या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

घाईगडबडीत निर्णय घेऊ नका

आयुष्यभरासाठी जोडीदार निवडताना घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. जोडीदार निवडताना तुमच्या पालकांचा आणि मित्रांचा सल्ला नक्की घ्या. पण शेवटी तुमच्या मनाचं ऐकून निर्णय घ्या आणि ज्याव्यक्तीसोबत तुम्ही आनंदी राहू शकाल आणि तुमचं संपूर्ण आयुष्य घालवू शकाल त्या व्यक्तीची निवड करा. कारण अनेकदा घाईगडबडीत घेतलेले निर्णय लोकांना मोठ्या अडचणीत आणतात. त्यामुळे जीवनसाथी निवडताना काळजीपूर्वक निर्णय घ्या, जेणेकरून तुम्हाला आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....