AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 1:00 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहे, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणसाने कुठे कसं वागलं पाहिजे? याचे काही नियम ठरलेले असतात. जेव्हा तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष करतात, किंवा जाणीवपूर्वक तुम्ही त्यांचं पालन करत नाहीत, तेव्हा तुम्ही समजात निंदेचा विषय ठरू शकतात. परंतु तुमचं वर्तन हे समाजाला अपेक्षित असं आदर्श असेल तर मात्र संपूर्ण समाज तुमचं कौतुक करतो. आपण जेव्हा आपल्या एखाद्या नातेवाईकांकडे जातो, तेव्हा काही गोष्टी या आवर्जून केल्याच पाहिजेत, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

पाहुण्यांच्या घरी जाताना कधीही रिकाम्या हाताने जाऊ नका – चाणक्य म्हणतात जेव्हा देखील तुम्ही तुमच्या एखाद्या पाहुण्यांच्या घरी जातात, तेव्हा कधीही रिकाम्या हाताने जाऊ नका, तुमच्या सोबत तुम्ही ज्या पाहुण्यांच्या घरी जाणार आहात, त्यांना देण्यासाठी एखादी छोटी का असत नाही, परंतु भेटवस्तू असूद्या. तुम्ही जेव्हा पाहुण्यांच्या घरी जाता, तेव्हा ते तुमचा आदरातिथ्य करतात. त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञा व्यक्त करण्याचा तो एक मार्ग असतो. त्यामुळे एखादी भेटवस्तू आवश्य सोबत ठेवा.

घरच्या गोष्टी – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जातात, तेव्हा ते तुमच्या कितीही जवळचे असू द्यात, परंतु कधीही घरचे वादाचे विषय त्यांच्यासमोर काढू नका, त्यावर शक्यतो चर्चा टाळाच, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

चाणक्य म्हणतात अनेकांना पाहुण्याच्या घरी किती दिवस राहिचं हेच कळत नाही, त्यामुळे आपल्या मर्यादा ओळखा, पाहुण्यांना कंटाळ येईल इतक्या दिवस दुसऱ्यांच्या घरी कधीच राहु नका, कारण त्यामुळे तुम्हाला मान मिळत नाही, मात्र तुम्ही जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर प्रत्येकाला तुम्ही  हवे हेवे वाटतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
मोठी बातमी! पंजाब, UP सह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या...
मोठी बातमी! पंजाब, उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे नवे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या तयारीत
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह