AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाणक्य सांगतात, ‘या’ 6 स्वभावाच्या लोकांना कधीच घरी बोलावू नका, आयुष्य करतील उद्ध्वस्त

आपल्या घरात सकारात्मक वातावरण राहवं, असं प्रत्येकाला वाटतं. पण घरात काही लोकं आल्यामुळे नकारात्मकता पसरते. अशात आचार्य चाणक्य सांगतात की, काही विचित्र स्वभावाच्या लोकांना घरात बोलावू नका... ज्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो.

चाणक्य सांगतात, 'या' 6 स्वभावाच्या लोकांना कधीच घरी बोलावू नका, आयुष्य करतील उद्ध्वस्त
| Updated on: Sep 16, 2026 | 4:45 PM
Share

आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितलं आहे, आयुष्यात काय करायला हवं आणि काय करु नये… याबद्दल चाणक्य नीतिमध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात की, एखादी व्यक्ती ज्या लोकांसोबत संगत करते, ते तिच्या यश, शांती आणि समृद्धीमध्ये मोठी भूमिका बजावतात. चाणक्य नीति हा एक प्राचीन ग्रंथ आहे, जो अर्थशास्त्र, राजकारण आणि मानवी संबंधांसह जीवनाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करतो. त्याद्वारे चाणक्य सांगतात की, विशिष्ट प्रकारच्या लोकांना आपल्या घरात कधीही आमंत्रित करू नये. त्यामुळे जाणून घ्या कोण आहेत ते लोक…

खोटारडे : चाणक्य नीती सांगतं की, खोटारड्यांना घरात बोलावल्याने भांडणं होऊ शकतात आणि तुमच्या वैयक्तिक प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. त्यांना घरात बोलावल्याने समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते.

जे पटकन रागावतात : क्षुल्लक गोष्टींवरूनही रागावणारे लोक घरात तणाव आणि अशांतता निर्माण करतात. यामुळे कुटुंबातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकते. म्हणूनच, चाणक्य सांगतात की, अशा लोकांशी जास्त संबंध ठेवू नयेत आणि त्यांना घरी आमंत्रितही करू नये.

मत्सर करणारे लोक : जे लोक नेहमी तुमचा मत्सर करतात, ते हळूहळू शत्रुत्व दाखवून तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याची शक्यता असते. अशा लोकांना आपल्या घरी न बोलावणेच उत्तम ठरतं

जे अफवा पसरवतात : जे लोक विनाकारण अफवा आणि खोट्या गोष्टी पसरवतात, ते तुमची गुपिते उघड करू शकतात आणि इतरांसमोर तुमची प्रतिमा मलीन करू शकतात. ते गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे, अशा लोकांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.

आळशी आणि सुस्त : चाणक्य आळशी आणि सुस्त लोकांना आपल्या घरी आमंत्रित न करण्याचा सल्ला देतात, कारण त्यांच्या आळशीपणाचा तुमच्यावर परिणाम होईल आणि तुमचे नुकसान होईल. आळशी आणि सुस्त लोकांच्या उपस्थितीमुळे तुमच्यातही आळशीपणा वाढेल आणि तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण होईल.

नीतिमत्ता नसलेले : जो कोणी अप्रामाणिक किंवा भ्रष्ट आहे, त्याच्यापासून दूर राहा. चाणक्य आपल्याला आठवण करून देतात की, नीतिमत्ता नसलेल्या व्यक्तीला आपल्या घरात आमंत्रित केल्याने मूल्यांवरील आपला विश्वास कमकुवत होतो.

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. )

Follow Us
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...