Chanakya Niti : संकट कितीही मोठं असू द्या, चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवा
आर्य चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ द्या, तुम्ही जर या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही त्यावर सहज मात कराल, जाणून घेऊयात त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनितीतज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरत आहे. आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, जााचा संबंध जीवन जगत असताना आपल्याला कुठेनं कुठे तरी येतच असतो. आपला मित्र कसा असावा? शत्रू कसा ओळखावा? आयुष्य जगत असताना काय करावं? काय करू नये? अशा एकना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.
कधी-कधी माणसावर अचानक मोठं संकट कोसळतं. अशा परिस्थितीमध्ये काय करावं काही सूचत नाही. सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. आर्य चाणक्य म्हणतात अशा परिस्थितीमध्ये तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे, ज्यामुळे तुम्ही तुमच्यावर आलेल्या कोणत्याही संकटांमधून सहज मार्ग काढू शकाल. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.
आत्मविश्वास – आर्य चाणक्य म्हणतात आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहेत. जिच्या जोरावर तुम्ही भल्या -भल्या संकटांना सहज मात देऊ शकतात. तुम्ही कोणत्याही संकटातून तुमच्याकडे असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर सहज मार्ग काढू शकाल. जर तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल तर छोटं संकटही तुम्हाला फार मोठं वाटेल, मात्र जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही संकटामधून सहज मार्ग काढू शकाल.
संयम ठेवा – तुमच्यावर आलेल्या कठीण परिस्थितीमध्ये संयम ठेवण्याचा सल्ला आर्य चाणक्य देतात. कोणतीही परिस्थिती फार काळ टिकत नसते. संयम ठेवा तुमच्यावर जी कठीण परिस्थिती ओढावली आहे, ती पण निघून जाईल असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
पैसा – आर्य चाणक्य म्हणतात तुमच्यावर आलेल्या अनेक संकटांचं उत्तर हे पैसा असंत, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही तुमच्यावर आलेल्या संकटांवर सहज मात करू शकतात. त्यामुळे तुम्ही पैशांची बचत केली पाहिजे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)