Chanakya Niti : या 5 गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्यभर आनंदी राहाल
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सुखी जीवनाचा मंत्र सांगितला आहे, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी सुखी जीवन कसं जगावं? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. आजही अनेकांना चाणक्य यांच्या विचारांपासून प्रेरणा मिळते. थोडक्यात आयुष्य जगत असताना काय करावं आणि काय करू नये? याचं सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे.
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टींवर चर्चा केली आहे, चाणक्य यांच्या मते याच गोष्टींमुळे माणसाचा आनंद हिरावा जातो. या गोष्टी माणसाच्या दु:खाचं कारण आहे. जर तुम्ही या गोष्टींचा त्याग केला तर आयुष्यभर आनंदी राहाल असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे, जाणून घेऊयात त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत?
आई-वडिलांच्या अज्ञांचं पालन करा – चाणक्य म्हणतात जगात केवळ अशा दोनच व्यक्ती आहेत, ज्या कधीच तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या अज्ञांचं पालन करा, आयुष्यभर आनंदी राहाल.
जोडीदाराची कायम साथ द्या – आर्य चाणक्य म्हणतात संसारामध्ये पती-पत्नी हे रथाची दोन चाके असतात. ती सोबतच चालली पाहिजेत, तरच संसाराचा रथ व्यवस्थित चालतो. अन्यथा एक चाक मागे आणि एक चाक पुढे झालं तर तो रथ व्यवस्थि चालणार नाही, म्हणून जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुमच्या जोडीदारासोबत कायम प्रामाणिक राहा, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
जेवढा पैसा आहे, तेवढ्यातच समाधान माना – आर्य चाणक्य म्हणतात तुमच्याकडे जेवढा पैसा आहे, तेवढ्यातच समाधान माना, पैसा कष्टानं कमवा, पैशांसाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका, कारण अनेक दु:खाचं कारण हा पैसाच आहे.
पैशांची बचत करा – आर्य चाणक्य म्हणतात तुमच्याकडे जो काही पैसा आहे, त्याची बचत करा, अनावश्यक खर्च टाळा. कारण संकट काळात तुम्ही बचत केलेला पैसाच तुमच्या कामी येणार आहे.
कोणाचाही द्वेष करू नका – आर्य चाणक्य म्हणतात प्रेम दिलं तरच प्रेम मिळतं, त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
