Chankya Niti : अशी मुलं असणाऱ्या आईवडिलांचं… चाणक्य नीती काय म्हणते?

पुत्र व्हावा ऐसा गुंडा... अशी एक मराठीत म्हण आहे. मुलं चांगली निपजली पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. मुलं चांगली निघाली तर आयुष्य सार्थकी लागते असंही म्हटलं जातं. म्हातारपणात मुलं आपला सांभाळ करतील अशी त्यांना आशा असते. मुलं चांगली निघणं हे भाग्याचं लक्षण समजलं जातं. आर्य चाणक्यांनीही आपल्या चाणक्य नीतीत याचा उल्लेख केला आहे.

Chankya Niti : अशी मुलं असणाऱ्या आईवडिलांचं... चाणक्य नीती काय म्हणते?
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 3:24 PM

प्रत्येक आईवडिलांना आपल्याला मुलं असावीत असं वाटतं. या मुलांनी आपलं संगोपण करावं असं वाटतं. मुलं शिकली पाहिजे, सुसंस्कृत झाली पाहिजे, असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. त्यासाठी ते धडपडत असतात. पण अनेकदा तर मुलं मोठी झाल्यावर आपल्या आईवडिलांना विसरतात. आईवडिलांना सोडून एकटे राहतात. त्यामुळे अनेक मातापित्यांच्या आयुष्यात जीवनाच्या अखेरीस एकाकीपण येतं. त्यांना एकटेपणात आपलं आयुष्य घालवावं लागतं. असे आईवडील कधीच सुखी राहत नाहीत. आचार्य चाणक्य यांनी संतान कशी असावी यावर महत्त्वाचे विचार मांडले आहेत. कशाप्रकारच्या संतानामुळे आईवडील सुखी होतात हे सांगितलं आहे.

आर्य चाणक्य यांनी नीती शास्त्रात मानवी जीवनाच्या अनेक अंगांवर भाष्य केलं आहे. अत्यंत सखोल अभ्या केला आहे. त्यांची नीती आजही तेवढीच प्रासंगिक आहे. त्यांनी आपल्या नीतीत गुणवान संतानावर भाष्य केलं आहे. ज्या लोकांच्या कुटुंबात असे गुणवान मुलं असतात, ते अत्यंत भाग्यशाली असतात. असं कुटुंब आनंदाने भरलेलं असतं. ते कुटुंबाचा गौरव वाढवतात. कोणत्या प्रकारची मुलं आईवडिलांचा गौरव वाढवतात तेच जाणून घेऊया.

आज्ञाधारक मुलगा

ज्यांची संतान आज्ञाधारक असते आणि संस्कारी असते ते अत्यंत भाग्यशाली असतात. अशी मुलं आपल्या आईवडिलांसह संपूर्ण कुळाचं नाव रोशन करतात. अशा मुलांपासून केवळ आईवडीलच नव्हे तर कुटुंबातील सर्व सदस्यांचं आयुष्य सफल होतं.

संस्कारी मुलं

संस्कारी मुलं आईवडील आणि गुरुजनांचा नावलौकिक करतात. महिलांचा सन्मान करतात. चांगल्या वाईट कामाची त्यांना माहिती असते. अशी मुलं नेहमीच कुटुंबाचं नाव रोशन करतात. अशा लोकांना यश मिळतच पण समाजही त्यांचा प्रचंड सन्मान करतो.

शिक्षणाला महत्त्व देणारी

जी मुलं ज्ञानप्राप्तीसाठी नेहमीच अतूर असतात, त्यांच्यावर सरस्वती आणि लक्ष्मी देवी प्रसन्न असते असं आर्यचाणक्य म्हणतात. चांगलं शिक्षण घेऊन ही मुलं कुटुंब आणि खानदानीचं नाव रोशन करतात.

जाणीव असणारी मुलं

आर्य चाणक्यांच्या मते केवळ ज्ञान असून पुरेसं नाही. तर ज्ञानानंतरची जाणीवही झाली पाहिजे. ज्ञानाच्या बळावर समाजातील अंधकार दूर करण्याची जाणीव झाली पाहिजे. ज्या कुटुंबात ज्ञानी आणि जाणीव असलेली मुलं असतात ते आपल्या मेहनत आणि ज्ञानाच्या जोरावर सर्व काही मिळवतात. तसेच कुटुंबाचं नावही रोशन करतात.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....