Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते ही लोकं सापापेक्षाही खतरनाक, यांच्या पासून दोन हात लांबच राहा

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते ही लोकं सापापेक्षाही खतरनाक, यांच्या पासून दोन हात लांबच राहा
chankaya niti

णक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) आपण आयुष्य कसे जगायला हवे याबाबत सांगितले आहे. चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आपण कोणत्या प्रकारच्या लोकांपासून सावध राहायला हवे याबद्द्ल सांगितले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 18, 2022 | 7:52 AM

मुंबई : आचार्य चाणक्य (Chanakya)  हे त्यांच्या ज्ञान आणि चपळ बुद्धीसाठी ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) आपण आयुष्य कसे जगायला हवे याबाबत सांगितले आहे. चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आपण कोणत्या प्रकारच्या लोकांपासून सावध राहायला हवे याबद्द्ल सांगितले आहे. आचार्य यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना केला होता, परंतु त्यांनी कधीही परिस्थितींपुढे हार मानली नाही. त्यांचे हे अनुभव लोकांच्या कामी यावेत असे त्यांना वाटत असावे म्हणूनच त्यांनी आपण आयुष्यात कोणत्या व्यक्तींपासून लांब राहावे हे सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या श्लोकांमध्ये सर्वांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, जर तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी आणि आनंदी व्हायचे असेल तर तुम्ही कोणाशी मैत्री करू नये. अशा परिस्थितीत आचार्य चाणक्य यांनी कोणत्या व्यक्तीची तुलना सापाशी केली आहे ते जाणून घेऊया

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेला श्लोक

दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः । सर्पो दंशति काले तु दुर्जनस्तु पदे पदे ।।

म्हणजेच सोप्या शब्दात याचा अर्थ असा की दुष्ट आणि साप यात विशेष फरक आहे की साप तुम्हाला तेव्हाच चावतो तेव्हाच त्याचा जीव धोक्यात असतो. परंतु दुष्ट माणूस प्रत्येक मार्गावर तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही.

जीवनात अशा मित्र-मैत्रिणींना सोबत ठेवावे जे तुमच्या सुख-दु:खात नेहमी तुमच्यासोबत उभे राहू शकतात. जर तुम्ही चुकूनही एखाद्या दुष्ट माणसाशी मैत्री केली असेल तर तो नेहमीच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान करत राहील हे निश्चित. म्हणूनच आपण नेहमी विचारपूर्वक कोणाशीही घनिष्ठ मैत्री वाढवली पाहिजे.

स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा – चाणक्य नीतिनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करु शकतात.

रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहा – चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीकडे जास्त राग आहे आणि ज्याच्याकडे शस्त्रे आहेत त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. असे लोक रागाच्या भरात काहीही करू शकतात जे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

Satyanarayan Katha | घरात श्री सत्यनारायण कथा आयोजित करताय, मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

18 January 2022 Panchang : मंगळवारचे पंचांग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Magh Maas 2022 | कधी सुरु होत आहे ‘माघ’ महिना, कधी आहे मौनी अमावस्या जाणून घ्या इंत्यभूत माहिती


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें