AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे चार असतात माणसाचे सर्वात चांगले मित्र, आयुष्यभर साथ सोडत नाहीत, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मैत्रीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात या जगात अशा चार गोष्टी आहेत, ज्या माणसाच्या सर्वात चांगल्या मित्र आहेत, संपूर्ण जगाने जरी तुमची साथ सोडली तरी देखील या गोष्टी कधीही तुमची साथ सोडत नाहीत.

Chanakya Niti : हे चार असतात माणसाचे सर्वात चांगले मित्र, आयुष्यभर साथ सोडत नाहीत, चाणक्य काय म्हणतात?
cahankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 29, 2026 | 6:58 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नवाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मैत्रीबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मित्र कसा असावा? मित्र कसा नसावा? आपला सर्वात जवळचा मित्र कोणता आणि केवळ आपल्यासोबत मैत्रीचं नाटक करणारी व्यक्ती कशी ओळखवावी? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नवाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की या जगात अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्या सर्वात जवळच्या मित्र आहेत. तुमच्या आयुष्यात काहीही झालं, सर्व जगाने जरी तुमची साथ सोडली तरी या गोष्टी तुमची आयुष्यात कधीही साथ सोडत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शिक्षण – चाणक्य म्हणतात विद्या अर्थात शिक्षण हे माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. कारण जर संपूर्ण जगाने जरी तुमची साथ सोडली आणि तुमच्याकडे उत्तम प्रकारचं शिक्षण असेल, तुम्ही उच्चशिक्षित असाल तर या जगात तुमचा कोणीही पराभव करू शकत नाही. जर तुम्ही शिकलेले असाल तर तुमच्या आयुष्यात अडचणी येणारच नाहीत, आणि जर समजा तुमच्या आयुष्यात अडचणी आल्याच तर तुम्ही त्यावर तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या जोरावर मात करू शकता. शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे, जी तुमची आयुष्यभर साथ सोडत नाही.

पत्नी – चाणक्य म्हणतात कोणत्याही माणसाची जर सर्वात जवळची मैत्रीण कोणी असेल तर ती म्हणजे त्याची पत्नी असते. पत्नी आपल्या पतीला त्याच्या प्रत्येक सुखा दु:खाच्या क्षणी साथ देते. पतीला पत्नीचा मोठा आधार असतो.

औषधी – चाणक्य म्हणतात औषध ही देखील एक अशी गोष्ट आहे, जी कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात जवळचा मित्र असते, कारण औषधांमध्ये तुम्हाला आजारपणातून बर करण्याची ताकद असते.

धर्म – चाणक्य म्हणतात धर्म हा मरेपर्यंत माणसाची साथ सोडत नाही, त्यामुळे धर्म देखील माणसाचा सर्वात जवळचा मित्र असतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर... नेमकं काय म्हणाली?
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?