AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या लोकांच्या घरात स्वत:हून धावून येते लक्ष्मी, घरात कधीच पैशांची पडत नाही कमतरता, कोण आहेत ते तीन लोक?

अशा घरांमध्ये स्वत:हून धावून येते लक्ष्मी. कधीच घरात लोकांना भासत नाही पैशांची कमतरता. आचार्य चाणक्य यांनी सांगितल्या 3 गोष्टी. जाणून घ्या सविस्तर

या लोकांच्या घरात स्वत:हून धावून येते लक्ष्मी, घरात कधीच पैशांची पडत नाही कमतरता, कोण आहेत ते तीन लोक?
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 03, 2026 | 7:17 PM
Share

आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील महान विद्वान, अर्थतज्ज्ञ आणि रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये जीवनातील अनेक पैलूंशी संबंधित मार्गदर्शन करण्यात आलं आहे. पैसा, कुटुंब, नातेसंबंध, व्यवहार आणि यश याबाबतचे त्यांचे विचार आजही चर्चेत असतात.

चाणक्य नीतीनुसार, घरातील वातावरण आणि माणसांच्या सवयींचा त्यांच्या सुख-समृद्धीवर परिणाम होतो असं मानलं जातं. काही गुण असलेल्या घरांमध्ये सकारात्मक वातावरण टिकून राहतं आणि अशा ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो अशी धारणा आहे. जाणून घेऊया त्या 3 गोष्टी कोणत्या…

गुणी आणि सज्जनांचा सन्मान

चाणक्य नीतीनुसार, ज्या घरात गुणी, कर्तृत्ववान आणि चांगल्या स्वभावाच्या व्यक्तींचा आदर केला जातो, तिथे सुख-समृद्धी नांदते. अशा घरातील सदस्य एकमेकांच्या गुणांची कदर करतात आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

घरात शांतता

ज्या घरात सतत भांडणं, वाद आणि कलहाचं वातावरण नसतं, तिथे सुख-शांती टिकून राहते असं चाणक्य नीतीत सांगितलं जातं. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, परस्पर आदर आणि संवाद असेल तर घरातील वातावरण प्रसन्न राहतं. याउलट, सततच्या वादामुळे कुटुंबातील शांतता आणि स्थैर्य बिघडू शकतं.

अन्नाचा आदर करणारे घर

चाणक्य नीतीमध्ये अन्नाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो, अन्नाची नासाडी केली जात नाही आणि त्याची किंमत जाणली जाते अशा घरात समृद्धी टिकून राहते अशी मान्यता आहे.

अन्न वाया न घालवणे ही केवळ धार्मिक किंवा पारंपरिक शिकवण नसून आजच्या काळातही ती आर्थिक शिस्त आणि जबाबदारीशी जोडलेली सवय मानली जाते. त्यामुळे अन्नाचा योग्य वापर करणं आणि त्याचा आदर करणं महत्त्वाचं आहे.

एकूणच, चाणक्य नीतीतील या शिकवणींमध्ये घरातील चांगलं वातावरण, परस्पर सन्मान आणि शिस्तीच्या सवयींवर भर देण्यात आला आहे. या विचारांचा अवलंब केल्यास कुटुंबातील वातावरण अधिक सकारात्मक आणि आनंदी होण्यास मदत होऊ शकते.

डिस्क्लेमर : या बातमीतील माहिती चाणक्य नीतीतील विचार आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक किंवा तथ्यात्मक प्रमाण मानू नये.

Follow Us
सरकारी पैशांतून राजकीय अजेंडा राबवला जातोय, बड्या नेत्याचा गंभीर आरोप
सरकारी पैशांतून राजकीय अजेंडा राबवला जातोय, बड्या नेत्याचा गंभीर आरोप
नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट
नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट
थेट रस्त्यावर आंधोळ करून निषेध; नवी मुंबईतील नागरिकांचे अजब आंदोलन
थेट रस्त्यावर आंधोळ करून निषेध; नवी मुंबईतील नागरिकांचे अजब आंदोलन
पुण्यातील गणेशोत्सवातील साऊंड सिस्टीम वाद: मंडळांची भूमिका
पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण वाद: मंडळांची भूमिका आणि बापटांच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह
विद्यानंद बापट: लाऊडस्पीकरवरील वाद, पुण्यातील ध्वनिप्रदूषणावर हल्लाबोल
विद्यानंद बापट यांचा लाऊडस्पीकरविरोधात हल्लाबोल:
मराठा आरक्षण: १९९४ च्या निर्णयावरुन विखे पाटील-शरद पवार वाद
मंडल आयोगावरून विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरुन राजकीय संघर्ष
तुम्ही स्वतःला देव समजता का? हायकोर्टाच्या प्रश्नावर तुकाराम मुंढे...
तुम्ही स्वतःला देव समजता का? हायकोर्टाच्या प्रश्नावर तुकाराम मुंढे असं काही म्हणाले की...
मोठी बातमी! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा थेट निर्णय! आता सर्वसामान्य...
सर्वात मोठी बातमी! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा थेट निर्णय! आता सर्वसामान्यांना सात दिवसांआधीच...
मनोज जरांगेंच्या उपोषणावर तोडगा निघणार? सरकारी शिष्टमंडळ अंतरवलीत दाखल
मनोज जरांगेंच्या उपोषणावर तोडगा निघणार? सरकारी शिष्टमंडळ अंतरवलीत दाखल
कोल्हापुरात तुफान राडा! कोल्हापुरात राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टी...
कोल्हापुरात तुफान राडा! कोल्हापुरात राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टी समर्थक आमनेसामने